राजकारण तापलं; भाजप आमदाराने शिंदेंच्या आमदाराच्या मुलालाच कार्यक्रमातून हाकललं

स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटामधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सध्या सुरू असलेल्या भांडी वाटप कार्यक्रमावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात श्रेयवादाचे राजकारण(Politics) चांगलेच तापले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे माजी मंत्री(Politics) आणि नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्याआधीच शिवसेना (शिंदे गट)चे विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र राम रघुवंशी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यक्रमस्थळी जाऊन गोंधळ घातला. लोकांना दिवसभर उन्हात बसवून ठेवले जात आहे, असा आरोप करत त्यांनी आक्षेप नोंदवला आणि वातावरणात तणाव निर्माण झाला.

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि भाजपचे नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेना (शिंदे गट)चे संपर्कप्रमुख व विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील राजकीय वाद नवीन नाही. मात्र, सध्या हे वाद अधिक तीव्र होत चालले आहेत. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या भांडे वाटप कार्यक्रमात दोघांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला.या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याचदरम्यान, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र आणि शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी कार्यक्रमस्थळी येत नंदुरबार तालुक्यातील काही लाभार्थ्यांना भांडे पेट्यांचे वाटप होत नसल्याची तक्रार आपल्या वडिलांकडे केली.

त्यानंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सकाळपासूनच वितरण सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी स्वतः वितरण स्थळी पोहोचले आणि परिस्थितीची पाहणी केली.त्यांनी उपस्थित ठेकेदाराला विचारणा केली की, “इतक्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थी उपस्थित असूनही, त्यांना पेट्या का देण्यात येत नाहीत?” यावर ठेकेदाराने उत्तर दिले की, “जोपर्यंत लोकप्रतिनिधी कार्यक्रम स्थळी येऊन संच वाटप करत नाहीत, तोपर्यंत वितरण करता येणार नाही.” हा प्रकार उघडपणे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्याचबरोबर भाजप(politics) आणि शिंदे गटातील समन्वय अभावी लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्रही यानिमित्ताने समोर आले आहे.

भांडे वाटपाच्या कार्यक्रमस्थळी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची एन्ट्री होताच वादास सुरुवात झाली. शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांच्या समोरच डॉ. गावित यांनी आरोप केला की, “येथे काही लोक तुम्हाला भडकावण्यासाठी आले आहेत. त्यांनी आदिवासींच्या घरकुलांना बंद पाडले, विहीर योजना ठप्प केली आहे.”

डॉ. गावित यांनी सांगितले की, या योजना बंद पाडण्यामागे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांचे सुपुत्र यांचा हात आहे. कार्यक्रमस्थळी दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक वाद विकोपाला गेला. डॉ. विजयकुमार गावित यांनी राम रघुवंशी यांना थेट “गेट आऊट” म्हणत, “हा आमचा कार्यक्रम आहे, मी आमदार(Politics) आहे. तुम्ही येथे काम करू शकत नाही, त्यामुळे इथून निघून जा” असे सांगितले. या वादात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उत्तर दिले की, “कोण कोणत्या गोष्टीचा लाभार्थी आहे हे मी पुढे सांगणार आहे.” तसेच, चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉ. गावित यांच्यावर आदिवासी जमिनी हडप करण्याचा गंभीर आरोपही केला.

हेही वाचा :

राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचा धमाका; भाजप स्वबळावर लढणार?

यंदा महाराष्ट्रात मान्सून लवकर का दाखल झाला? जाणून घ्या हवामान तज्ज्ञ काय म्हणतात?

सांगली, कोल्हापुरातील पूर टाळण्यासाठी ‘आलमट्टी’ची पातळी 517 मीटरवर ठेवा; दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांची उद्या बैठक