सांगली, कोल्हापुरातील पूर टाळण्यासाठी ‘आलमट्टी’ची पातळी 517 मीटरवर ठेवा; दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांची उद्या बैठक

कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आलमट्टी धरणाची(dam) पाणी पातळी १५ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरवर स्थिर ठेवण्याचा निर्णय कर्नाटक प्रशासनाने घेतला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने झालेल्या आंतरराज्य बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीत कोल्हापूर, सांगली, बेळगाव, विजापूर जिल्हाधिकाऱ्यांसह दोन्ही राज्यांच्या जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

या बैठकीत पूर नियंत्रणासाठी पुढील महत्त्वाचे मुद्दे ठरवण्यात आले:

🔹 आलमट्टी धरणातील(dam) पाणी विसर्गाची वेळोवेळी माहिती महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाला देणे
🔹 रिअल टाइम डेटा बेस यंत्रणा नारायणपूर धरणापर्यंत कार्यान्वित करणे
🔹 दोन्ही राज्यांचे समन्वय अधिकारी नेमणे: वारणा, कोयना, राजापूर आणि आलमट्टी धरणावर विशेष अधिकारी तैनात करणे
🔹 हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे पूर काळात उघडे ठेवणे
🔹 पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांना वेळेत इशारा देण्यासाठी इशारा व्यवस्था बळकट करणे
🔹 पूरग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी नियोजन आणि समन्वय साधणे

याशिवाय, महाराष्ट्र-कर्नाटक मुख्य सचिवांची संयुक्त बैठक २९ जुलै रोजी होणार असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी दोन्ही राज्यांतील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये अधिक सखोल चर्चा होणार आहे.

बैठकीत सहभागी असलेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे, बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विजापूर जिल्हाधिकारी संबित मिश्रा, कोल्हापूर पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, सांगली पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जलसंपदा विभागाचे सी. एच. पाटोळे, तसेच आलमट्टी धरणाचे प्रमुख अभियंता उपस्थित होते.

हेही वाचा :

भाजप नेत्याचा ‘तो’ VIDEO व्हायरल, कार्यालयातच महिलेच्या मिठीत पडून..

‘तुझा नंबर दे… सेक्सी दिसतेस’, सुदेश म्हशीलकरचा मराठी अभिनेत्रीला अश्लील मेसेज

आयपीएल 2025 मध्ये टॉप 2 मध्ये कोण जाणार? जाणून घ्या अंतिम समीकरण