जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?
पाच दिवसांच्या तेजीला अखेर शुक्रवारी ब्रेक(stock market) लागला आणि भारतीय इक्विटी इंडेक्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी 22,400 च्या खाली घसरला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 609.28 अंकांनी अर्थात 0.82 टक्क्यांनी घसरून 73,730.16 वर आणि निफ्टी 150.30 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी घसरून 22,420 वर आला.
दिवसभर निफ्टीवर(stock market) विक्रीचा दबाव दिसून आल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. डेली चार्टवर, निफ्टीला 22,560 – 22,625 च्या रेझिस्टन्स झोनमधून विक्रीच्या दबावाचा सामना करावा लागला आहे. जोपर्यंत निफ्टी या झोनमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत कंसोलिडेशन सुरू राहील अशी आशा आहे. तर खाली निफ्टीला आता 22240 – 22200 वर सपोर्ट आहे जिथे 40-मूव्हिंग एव्हरेज आहे.
बँक निफ्टीमध्ये आदल्या दिवशीच्या निचांकावरून झालेली रिकव्हरी ही शॉर्ट टर्म रिकव्हरी होती. फॉलो-अप खरेदीचा अभाव होता. अशा स्थितीत बँक निफ्टीमध्येही शॉर्ट टर्म कंसोलिडेशन दिसू शकते. तर खाली 47,500 वर सपोर्ट दिसत आहे.
आज जागतिक बाजारातून तेजीचे संकेत आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारात चांगली वाढ झाली. यानंतर आज आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून येत आहे. आज गिफ्ट निफ्टी आणि अमेरिकन फ्युचर्स मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टी 0.43% च्या वाढीसह 22,650 च्या वर व्यवहार करत आहे.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
- बजाज फायनान्स (BAJFINANCE)
- बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
- इंडसइंड बँक (INDUSINDBK)
- नेसले इंडिया (NESTLEIND)
- एसबीआय लाईफ (SBILIFE)
- ए यू बँक (AUBANK)
- पॉलीकॅब (POLYCAB)
- इंडियन हॉटेल (INDHOTEL)
- पर्सिस्टंट (PERSISTENT)
- पेज इंडिया (PAGEIND)
नोंद – म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
हेही वाचा :
राखी सावंतचं हे रुप तुम्ही कधीही पाहिलं नसेल! Video Viral
पोस्ट ऑफिसची योजना भारी; बँकेच्या एफडीपेक्षा करा जादा कमाई
‘मी प्रत्येक सामन्यानंतर..’; धोनीने सांगितलं 17 वर्षांपासून IPL मध्ये मिळणाऱ्या यशाचं Secret