बँक ऑफ बडोदामध्ये भरतीला सुरुवात; पदवीधरांना करता येईल अर्ज

जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे.(Recruitment )बँक ऑफ बडोदा ने विविध विभागांमध्ये एकूण 330 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि इतर पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, अंतिम दिनांक 19 ऑगस्ट 2025 आहे.या भरतीतील प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता निर्धारित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये BE/B.Tech Computer Science, IT, Cyber Security, Electronics, MCA, PGDCA, तसेच
ME/M.Tech/M.Sc CS/IT/Electronics/Security अशा तांत्रिक डिग्री पात्र आहेत. काही पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार देखील अर्ज करू शकतात. त्यामुळे, अर्ज करण्याआधी पदानुसार शैक्षणिक पात्रता तपासणे आवश्यक आहे.

उमेदवारांना भरतीसाठी काही ठराविक वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.(Recruitment ) या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 24 वर्षे आणि कमाल 45 वर्षांपर्यंत असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाईल. तसेच सामान्य, ओबीसी, EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्ह्णून ₹850 + टॅक्स + पेमेंट गेटवे शुल्क भरावे लागणार आहे, तर SC/ST/PwD/महिला उमेदवार ₹175 + टॅक्स + पेमेंट गेटवे शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

bankofbaroda.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
“Careers” या टॅबवर क्लिक करा.
“Current Openings” मध्ये संबंधित भरतीचा लिंक निवडा.
“Click here for New Registration” वर क्लिक करून नोंदणी करा.
अर्जात वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट घेऊन ठेवा.
बँक ऑफ बडोदा ही भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, (Recruitment )या भरतीद्वारे अनेक तरुणांना प्रतिष्ठित करिअर घडवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही संधी गमावू नये आणि वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

हेही वाचा :