‘ती’ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बिहारमधून समोर येत आहे.(broke)नराधम बापाने १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडितेची आई माहेरी गेल्यानंतर त्यानं हे दुष्कृत्य केलं आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवला. तसेच वैद्यकीय तपासणी केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना बिहारच्या डुमरा गावात घडली. पीडितेची आई काही दिवसांपासून माहेरी गेली होती. पीडित मुलगी तिच्या तीन लहान भावंडांसह आणि वडिलांसह घरी होती. गेल्या काही दिवसांपासून पीडितेचे वडील तिला धमक्या देऊन तिच्यासोबत दुष्कृत्य करत होते. ३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास जेवण झाल्यानंतर पुन्हा जबरदस्ती करण्यास सुरूवात केली.

यानंतर मुलगी ओरडू लागली. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकताच शेजारी राहणाऱ्या काकींनी तेथे धाव घेतली. तसेच इतर गावकरीही तेथे पोहोचले.(broke) वडिलांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर गावकऱ्यांनी नराधमाला पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला थेट पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पोलिसांनी या प्रकरणी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. यावेळी पीडितेची आई माहेरहून आली.(broke)तिने देखील जबाब दिला. पोलिसांनी तक्रारीनुसार, नराधम पित्याला अटक केली असून, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :