टाटा मोटर्सने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. Tata Punch ही त्यातीलच एक कार.(punch car) नुकतेच या कारने एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

टाटा पंचने चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत 6 लाख युनिट्स उत्पादनाचा विक्रमी टप्पा पार करत भारतात आपले स्थान(punch car) अधिक दृढ केले आहे. देशभरातील ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे ही कार भारतातील सर्वाधिक पसंतीची सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आहे. महाराष्ट्राने एकूण उत्पादनात 12% योगदान दिले असून, ही लोकप्रियता महानगरांपासून ग्रामीण भागापर्यंत दिसून येते.
ऑक्टोबर 2021 मध्ये “प्रत्येक भारतीयासाठी एसयूव्ही अनुभव सहजसाध्य करणे” या हेतूने लाँच झालेली टाटा पंच, आजच्या घडीला नव्या युगातील SUV संस्कृतीचे प्रतीक ठरली आहे. पंचने केवळ शहरातच नव्हे तर दुर्गम भागांतही आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. 2024 मध्ये ही कार भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली, ज्यातून तिच्या सार्वत्रिक(punch car) स्वीकाराची प्रचिती येते.
पंचचे यश त्याच्या विशिष्ट फीचर्समुळेच आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पंचने Global NCAP आणि Bharat NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळवले आहे. ही कार पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. जवळपास 70% पंच ICE ग्राहक हे पहिल्यांदाच कार खरेदी करणारे आहेत. महिलांमध्येही पंच विशेष लोकप्रिय असून पंच.eV च्या 25% मालक महिला आहेत. पंचची 38% मार्केट शेअर ही देखील तिच्या विभागातील भक्कम स्थानाची साक्ष आहे.
प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये पंचचा मालकीहक्क अनुक्रमे 24%, 42% आणि 34% इतका असून, यामधून तिच्या व्यापक आकर्षणाचा अंदाज येतो. शिवाय, पंचने आतापर्यंत 20 हून अधिक प्रतिष्ठित ऑटोमोटिव्ह पुरस्कार प्राप्त केले आहेत.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे सीसीओ विवेक श्रीवत्स म्हणतात, “पंचमधून आधुनिक भारतीयांचा आत्मविश्वास आणि स्वावलंबन दिसून येतो. 6 लाख युनिट्स पार करणे हे केवळ आकड्यांचे नव्हे तर ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतिक आहे.”
या प्रवासाच्या साजरीकरणासाठी टाटा मोटर्सने ‘इंडिया की एसयूव्ही’ ही विशेष मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतून देशभरातील पंच ग्राहकांच्या सशक्ततेच्या, साहसाच्या आणि आत्मनिर्भरतेच्या कथा मांडल्या जातील. टाटा पंच आता केवळ एक कार न राहता, आधुनिक भारतीयांच्या जीवनशैलीचा भाग बनली आहे.
हेही वाचा :