धो धो कोसळणार आज राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या (rain)अंदाजानुसार, रविवारी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
देशासह राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसात मोठा बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट दिसून येत आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत. राज्यात वीकेंडला उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली
राज्यात काही भागात येलो अलर्ट
महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही आज पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस(rain) होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदमगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट जारी करण्या आला आहे. गेल्या दोन दिवसातही राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे
कुठे ऑरेंज, तर कुठे येलो अलर्ट
अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच नागपूर, गोंदिया आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काही भागात उन्हाच्या झळा
एकीकडे पावसाची हजेरी पाहायला मिळत असली तरी, काही भागात उन्हाच्या झळा बसत आहेत. पुढील 24(rain)तासात पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमा येथे वेगळ्या ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आयएमडीकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा
एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह देशातील तापमानात वाढ होताना दिसत आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात पुढील दोन दिवस रात्रीच्या वेळी उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यात पुढील 24 तास पारा 40 अंशांवरच राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
सोमवती अमावस्येला वर्षातले पहिले सूर्यग्रहण या ४ राशींनी राहा सावध
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
हनिमूनला गेल्यावर कपल्सने कधीच करु नका या 5 चूका