सांगलीच्या जागेचा तिढा दिल्ली दरबारी

या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार सुरु केला आहे. तर या जागेसाठी आग्रही असलेल्या काँग्रेस नेत्यांनी शुक्रवारी रात्रीच दिल्ली गाठली. या काँग्रेस नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन सांगलीच्या जागेवर चर्चा केली.

महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तिढा(place)निर्माण झाला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केला आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसचा आग्रह कायम आहे. या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार सुरु केला आहे. तर या जागेसाठी आग्रही असलेल्या काँग्रेस नेत्यांनी शुक्रवारी रात्रीच दिल्ली गाठली. या काँग्रेस नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन सांगलीच्या जागेवर चर्चा केली.

सांगली लोकसभा निवडणुकीचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी पोहोचला आहे. काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी काल रात्रीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. सांगलीतील(place) या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संघटन महासचिव के सी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी सांगलीच्या जागेसाठी पक्षाकडे आग्रह केला आहे. या भेटीत मैत्रीपूर्ण लढतीचाही प्रस्ताव पक्षाकडे मांडल्याची माहिती मिळत आहे.

सांगलीत उद्धव ठाकरे यांनी उमदेवार चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर सांगलीतील उमेदवार चंद्रहार पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. याचदरम्यान, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी शुक्रवारी रात्रीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.

सांगलीच्या जागेवर अनेक वर्षांपासून काँग्रेसचं अस्तित्व आहे, त्यामुळे ही जागा सोडायला नको, अशी भूमिका दोघांनी वरिष्ठांकडे मांडली. त्यानंतर येत्या १-२ दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असं आश्वासन वरिष्ठांकडून दोन्ही नेत्यांना मिळाल्याची माहिती समजत आहे.

या भेटीत मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावावर देखील चर्चा (place)झाल्याची माहिती मिळत आहे. पण मैत्रीपूर्ण लढतीने महाविकास आघाडीवर काय परिणाम होतील, याचाही विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य, अशी या दोन्ही नेत्यांची भूमिका आहे. या दोन्ही नेत्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला आणि मुकुल वासनिक यांची नागपुरात भेट होणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

हेही वाचा :

“सुंदर मुली घ्या पाणीपुरी” नाविन्यपूर्ण उदयनराजेंची दाद, वायसी कॉलेज मध्ये नेमकं काय घडलं?

जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत मारत… कोयता नाचवत रील बनवली, पोलिसांनी दट्ट्या देताच हिरोगिरी…

ओबीसी उमेदवार देण्याची मागणी करणाऱ्या आंबेडकरांनीच अखेर यू-टर्न घेतला!