पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच
तुमच्या घरात पेन्शनधारक कोणी असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरी(pension plan) करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पेन्शनधारकांच्या (जे पेन्शनचा लाभ घेतात) सोयीसाठी सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने म्हणजेच SBI ने ‘इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल’ नावाचे नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. जाणून घ्या काय आहे हे पोर्टल आणि कोणत्या सुविधा असणार आहेत?
‘इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल’ हे पोर्टल एकूण पाच बँकांच्या पेमेंट(pension plan) सेवा आणि पेन्शन प्रक्रिया एकाच ठिकाणी आणणार आहे. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या निवेदनात म्हटले आहे की, पेन्शन सेवा डिजिटल करण्यासाठी आणि पेन्शनधारकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
पेन्शनशी संबंधित सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये, पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक आणि सेवा संबंधित तपशील समाविष्ट केले जाऊ शकतात. यासोबतच सेवानिवृत्त लोकांना त्यांच्या पेन्शन मंजूरीबाबत एसएमएस किंवा ईमेलद्वारे माहिती दिली जाईल जेणेकरून त्यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती राहील.
पेन्शन प्रक्रिया आणि पेमेंट पूर्णपणे डिजिटल करणे हा त्याचा उद्देश आहे. यामध्ये सेवानिवृत्त व्यक्तीला त्याची कागदपत्रे ऑनलाइन जमा करण्याची, डिजीलॉकरवर पाठवण्याची आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पीपीओ जारी करण्याची सुविधा आहे.
‘इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल’ सुरू झाल्यानंतर, पाच बँकांशी संबंधित पेन्शन घेणारे लोक त्यांच्या पेन्शनशी संबंधित तपशील जसे की जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची स्थिती, फॉर्म-16, भरायच्या आणि प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील आणि पेन्शन स्लिप पाहू शकतील.
यावर सेवानिवृत्त कर्मचारी त्यांची मासिक पेन्शन स्लिप पाहू शकतात तसेच जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म-16 जमा करण्याची स्थिती पाहू शकतात. पूर्वी ही सुविधा फक्त SBI पेन्शनधारकांसाठी होती, परंतु आता SBI, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेचे पेन्शनधारक देखील या पोर्टलचा लाभ घेऊ शकतात.
हेही वाचा :
2029 पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील…
‘उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये’, पवारांचं सूचक विधान
मुंबई इंडियन्ससाठी ‘या’ समीकरणाने प्लेऑफचा मार्ग अजूनही खुला