कोल्हापूर पंचगंगा नदीत हजारो मृत माशांचा खच
पंचगंगा नदीतील पाण्याने तळ गाठला आहे. घाट परिसरातील पात्र उथळ असल्यामुळे हा परिसर कोरडा पडला आहे, तर बंधाऱ्याच्या पश्चिमेस नदीपात्रात पाणी साचले आहे.
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषित झाले असून,(acquired ) त्यामुळे हजारो मासे मृत झाले आहेत. नदी पात्रात मृत माशांचा खच पडला असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रशासकीय यंत्रणा गुंतली असताना दुसरीकडे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, घाटाला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पंचगंगा नदीतील पाण्याने तळ गाठला आहे. घाट परिसरातील पात्र उथळ असल्यामुळे हा परिसर कोरडा पडला आहे, तर बंधाऱ्याच्या पश्चिमेस नदीपात्रात पाणी साचले आहे. या पाण्याला काळाकुट्ट रंग आला आहे. खबरदारी म्हणून महापालिकेने चार दिवसांपूर्वीच पंचगंगा नदीतील उपसा बंद केला आहे. (acquired)त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद आहे. धरणातून पाणी सोडलेले नाही. त्यामुळे नदी प्रवाहित नाही. परिणामी, नदीपात्रात दूषित पाणी मोठ्या प्रमाणात मिसळले आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी प्रदूषित झाले आहे. पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे मासे तडफडून मृत झाले.
पात्रात पाण्याच्या कडेला हजारो मासे मृत होऊन पडले आहेत. मृत झालेल्या लहान माशांचा तर अक्षरशः खच पडला आहे. मृत मासे सडू लागल्याने नदी घाट परिसरात दुर्गंधी पसरत आहे. वास्तविक त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. मात्र, त्याकडे निवडणुकीच्या धांदलीत कुणाचेही लक्ष गेलेले नाही. एकिकडे पाणी तीव्र प्रदूषित झाले असतानाही बंधाऱ्यातील साचलेल्या पाण्यात नागरिकांची पोहण्यासाठी, अंघोळीसाठी वर्दळ कायम आहे. वास्तविक यावर निर्बंध घालण्याची आवश्यकता होती.
घाट परिसरात अस्वच्छता
पूर्वी नदी घाटावर कपडे, वाहने, जनावरे धुण्यास निर्बंध घालण्यात आले होते. अगदी पूजा विधी करण्यावरही मनाई करण्यात आली होती. काही कालावधीनंतर ही नियमावरील मागे पडली. (acquired)सध्या घाट परिसर प्रचंड अस्वच्छ असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सुंदर असलेल्या या परिसरात सध्या अवकळा आली आहे.
नदी प्रवाहित करण्याची गरज
या उन्हाळ्यात अनेकवेळा नदीतील पाण्याने तळ गाठला होता. पण, धरणांतून पाणी सोडल्यामुळे नदी प्रवाहित झाली होती. त्याचा फटका जलचरांना झाला नव्हता. आता मात्र प्रदूषणाची तीव्रता वाढली असून, नदीपात्रात साचलेले पाणी गटारीतील पाण्यापेक्षाही घाणेरडे आहे. अगदी चूळ भरण्यासाठीही तोंडात पाणी घेण्याचेही धाडस होणार नाही. त्यामुळेच मासे मृत झाले आहेत.
हेही वाचा :
तुळजापूर संस्थानमध्ये 8.43 कोटींचा भ्रष्टाचार
उमरखेडमध्ये अक्षय तृतीयेला होतात बालविवाह..!
दाभोलकर हत्या प्रकरणाचा जवळपास ११ वर्षांनी निकाल लागणार