यकृत अन् मूत्रपिंड डिटॉक्स करायचेय? ८ फळांचा रोजच्या आहारात करा समावेश

यकृत आणि मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील दोन महत्त्वपूर्ण अवयव आहेत. हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करतात.(fruits)यकृत अन् मूत्रपिंडामुळे अन्नाचे पचन प्रक्रिया व्यवस्थित होते. अन्नातील पोषक तत्त्वांचे विघटन करून ऊर्जा निर्मितीला मदत होते. तसेच रक्तातील साखर आणि चरबीचे संतुलन राखते. यकृत विषारी द्रव्यांना शरीराबाहेर टाकण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करते, ज्यामुळे शरीर स्वच्छ आणि निरोगी राहते. पण चुकीचा आहार, ताण आणि प्रदूषणामुळे या अवयवांवर ताण येतो. यकृत आणि मूत्रपिंड तंदुरुस्त अन् स्वच्छ ठेवण्यासाठी दररोजच्या आहारात ८ फळांचा समावेश केल्यास फायदा होईल. पाहूयात त्याबाबत सविस्तर…सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचा तंतुमय पदार्थ असतो. त्यामुळे विषारी पदार्थ पोटातून बाहेर टाकतो आणि यकृतावरील ताण कमी करतो. लिंबूवर्गीय फळे, संत्री आणि मोसंबी, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. यामुळे यकृतातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि मूत्रपिंडांचे कार्य सुधारते. पपईमध्ये पपैन नावाचे एन्झाइम आहे, त्यामुळे प्रथिनांचे पचन सुलभ करते आणि यकृताला हलके करते. द्राक्षांमधील रेस्वेराट्रॉल नावाचा पदार्थ यकृतातील जळजळ कमी करतो आणि मूत्रपिंडांना संरक्षण देतो.

कलिंगड हे ९०% पाण्याने बनलेले फळ आहे. कलिंगडाच्या सेवनामुले मूत्रपिंडांना विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. (fruits)ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी यांसारखी बेरी फळे अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतात. त्यामुळे यकृत आणि मूत्रपिंडांना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात. डाळिंबामध्ये प्युनिकालाजिन नावाचे अँटिऑक्सिडंट आहे. मूत्रपिंडांना डायलिसिसच्या रुग्णांमध्ये विषारी पदार्थ कमी करण्यास आणि स्टोन होण्यापासून रोखण्यास मदत करते.अननसामधील ब्रोमेलेन एन्झाइम पचन सुधारते आणि यकृताला डिटॉक्सिफाय करते. या फळांचा रोजच्या आहारात समावेश करा. यासोबतच पुरेसे पाणी प्या, प्रक्रिया केलेले अन्न टाळा आणि नियमित व्यायाम करा. यामुळे यकृत आणि मूत्रपिंड दीर्घकाळ निरोगी राहतील आणि शरीरातील विषारी पदार्थ नैसर्गिकरित्या बाहेर टाकले जातात.

असंतुलित आहार, कमी पाणी पिणे, जास्त ताण आणि प्रदूषण यामुळे यकृत आणि मूत्रपिंड कमजोर होऊ शकतात. त्यांना निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली आवश्यक आहे. कोणते फळ खाल्ल्याने काय होऊ शकते?

सफरचंद : पेक्टिनमुळे विषारी पदार्थ पोटातून बाहेर टाकते, यकृतावरील ताण कमी करते.
लिंबूवर्गीय फळे: संत्री, मोसंबी व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने यकृत-मूत्रपिंड निरोगी ठेवतात.
पपई : पचन सुधारते, यकृताला हलके करते.
द्राक्षे : रेस्वेराट्रॉलमुळे यकृतातील जळजळ कमी करते, मूत्रपिंडांना संरक्षण.
कलिंगड: ९०% पाण्यामुळे मूत्रपिंडांना डिटॉक्स आणि हायड्रेशनसाठी मदत.
बेरी फळे: ब्लूबेरी,(fruits) क्रॅनबेरी अँटिऑक्सिडंट्सने मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण.
डाळिंब: प्युनिकालाजिनमुळे मूत्रपिंडातील विषारी पदार्थ कमी, स्टोन प्रतिबंध.
अननस: ब्रोमेलेन एन्झाइम पचन सुधारते, यकृत डिटॉक्स करते.

हेही वाचा :