‘एवढ्या’ फेऱ्यानंतर कळणार सांगलीचा ‘पाटील’ कोण?

मतमोजणीसाठी नियुक्त उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी नियमांचे पालन करावे, (appoint)असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केलं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील, काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटीलयांच्यात निवडणूक झाली.

मतदानाची मतमोजणी 4 जूनला सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. 25 फेर्‍यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे.

मतमोजणीसाठी नियुक्त उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे(appoint), उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनीचे यांच्यासह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथील स्ट्रॉगरुममध्ये ईव्हीएम कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवल्या आहेत. 4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून सकाळी 7 वाजता उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष स्ट्रॉगरुम उघडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

यासाठी नियुक्त प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे. मतमोजणी (appoint)केंद्रावर मोबाईल वापरास अनुमती नसल्याने मतमोजणी प्रतिनिधी वा अन्य कोणीही मोबाईल, स्मार्ट वॉच सोबत ठेवू नये. मतमोजणी केंद्रावर नियुक्त प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या प्रतिनिधींची माहिती प्रशासनास विहित वेळेत द्यावी.

प्रतिनिधींची नावे कळविताना विधानसभा मतदारसंघनिहाय व टेबल क्रमांकानुसार नावे कळवावित. त्यानुसारच त्यांना त्या पद्धतीने ओळखपत्र वितरित केली जातील. प्रतिनिधींनी ओळखपत्र शिवाय ओळखीचा आणखी एक पुरावा म्हणून आधार कार्डही सोबत ठेवावे. ओळखपत्राचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी.

प्रतिनिधींना त्यांना नेमून दिलेला टेबल सोडून इतर कोठेही फिरता येणार नाही. लोकसभा सांगली मतदार संघातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर म्हणजे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे.

विधानसभा मतदारसंघ मतमोजणी फेर्‍या –

  • मिरज – 22
  • सांगली – 22
  • पलूस कडेगाव – 20
  • खानापूर-आटपाडी – 25
  • तासगाव-कवठेमहांकाळ – 21
  • जत – 20

हेही वाचा :

शरद पवार गटाचे आमदार काँग्रेसमध्ये जाणार

जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद

हनीमून पॅकेजच्या नावाखाली फ्लॅटमध्ये सुरु हाेतं भलतंच