जसप्रीत बुमराह कोणाच्या प्रेमात वेडा झाला होता? पळून जाण्याची होती तयारी; अखेर खरं काय ते समोर आलं.

जसप्रीत बुमराहचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे अनेक चाहते आहे.(away) तसेच काही जण त्याच्या प्रेमातही पडले आहे. पण वेगवान गोलंदाज बुमराह एका मुलीच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला होता. त्याच्याबाबतचा हा खुलासा ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याबाबत त्याची पत्नी संजना गणेशन हीनेच गुपित उघड केलं आहे. संजनाने सांगितलं की, बुमराह एका मुलीच्या प्रेमात वेडा झाला होता. तिच्यासोबत पळून लग्न करण्याच्या तयारीत होता. जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स प्रेजेंटर संजना गणेशन यांचं लग्न मार्च 2021 मध्ये झालं होतं. लग्नाच्या चार वर्षानंतर संजनाने हा खुलासा केला आहे. बुमराह आणि संजना यांनी ‘हू इज द बॉस’ या हरभजन सिंह आणि गीत बसराच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दोघांनी अनेक खुलासे केले.
कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये संजनाने लग्नापूर्वीच्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. यात तिने बुमराहचं गुपित सांगितलं. संजनाने सांगितलं की बुमराह माझ्यासोबत पळून जाऊन लग्न करण्यास तयार होता. यावर संजनाने त्याला सांगितलं की, ‘तू रन अप वर देखील पळत नाहीस, तर माझ्यासोबत काय पळशील?(away)’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सध्या जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यावर आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही असं दिसत आहे.