रोहित शर्मानंतर भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण? ‘या’ 3 नावांची चर्चा

पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. बुधवार, 7 मे रोजी रोहित शर्माने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा करत सर्वांना धक्का दिला.

तर दुसरीकडे 20 जूनपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे मात्र आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा पुढचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, कसोटीमध्ये कर्णधार पदासाठी तीन नावांची चर्चा सुरु आहे.

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहचे नाव सध्या कर्णधार पदासाठी सर्वात पुढे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमधील पहिल्या आणि पाचव्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तसेच बुमराहने इंग्लंडविरुद्ध झालेल्या एका कसोटी सामन्यात देखील भारताचे नेतृत्व केले आहे. यामुळे रोहित शर्मानंतर पुढचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत जसप्रीत बुमराहचे नाव आघाडीवर आहे.

जसप्रीत बुमराहसह भारताचा पुढचा कसोटी कर्णधार होण्याच्या शर्यतीत शुभमन गिलचे नाव देखील आहे. सध्या शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याला कर्णधार पद मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून कसोटी क्रिकेटमध्ये शुभमनची कामगिरी देखील दमदार असल्याने निवडकर्ता त्याच्या नावाचा विचार करु शकतात.

रोहित शर्मानंतर(Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार होण्याच्या शर्यतीत ऋषभ पंतचे नावही चर्चेत आहे. पंतने गेल्या काही महिन्यात कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्याने ऋषभ पंत याच्या नावाची देखील चर्चा सध्या सुरु आहे.

हेही वाचा :

फक्त ५ मिनिटांत बनवा झटपट आणि चविष्ट ‘दही चटणी टोस्ट’!

हार्दिक पांड्या किती चुकणार? BCCI ने त्याच्यासह Mumbai Indians च्या सर्व खेळाडूंवर कारवाई 

राज्याच्या ‘या’ भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस