मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याला इंडियन(against) प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आणखी एक धक्का बसला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. हार्दिकला आयपीएलने शिस्तभंगाच्या आरोपाखाली दंड ठोठावला आहे. त्याशिवाय गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा याच्यावरही दंडात्मक कारवाई केली गेली आहे.

मुंबई इंडियन्सने ८ बाद १५५ धावा उभ्या केल्या, परंतु पावसामुळे या सामन्यात सातत्याने व्यत्यय येत राहिला. त्यामुळे गुजरात टायटन्ससमोर १९ षटकांत १४७ धावांचे लक्ष्य ठेवले गेले. ६ चेंडूंत १५ धावा हव्या असताना गुजराजतने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली. या सामन्यात वेळेत षटकं पूर्ण न केल्यामुळे हार्दिकला २४ लाखांचा दंड ठोठावला गेला आहे. त्याच्यासह मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक खेळाडूला ६ लाख किंवा त्यांच्या मॅच फीमधील २५ टक्के रक्कम यापैकी जे कमी आहे, ते दंड म्हणून भरावे लागणार आहेत. हार्दिकने दुसऱ्यांदा ही चूक केली आहे.
आयपीएलने या पर्वात कर्णधारावर मॅच बंदीच्या कारवाईचा नियम काढून टाकला आहे. हार्दिकला याच नियमामुळे मागील पर्वात एका सामन्याच्या बंदीचा सामना करावा लागला होता आणि त्यामुळे आयपीएल २०२५ च्या पहिल्या लढतीत तो खेळू शकला नव्हता. (against) आता बंदीचा नियम काढून टाकल्यामुळे पुन्हा पुन्हा चुक झाल्यास दंडाची रक्कम वाढत जाईल आणि कर्णधाराला डिमेरिट्स गुण मिळतील.
याच सामन्यात आशिष नेहरा याच्यावरही शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. त्याला त्याच्या मॅच फीमधील २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावा लागणार आहे आणि १ डिमेरीट गुणही दिला गेला आहे.विल जॅक्स ( ५३), सूर्यकुमार यादव ( ३५) व कॉर्बिन बॉश ( २७) यांच्या खेळीमुळे मुंबईने ८ बाद १५५ धावा केल्या. (against) प्रत्युत्तरात आलेल्या गुजरातकडू शुभमन गिल ( ४३), जॉस बटलर ( ३०) व शेर्फाने रुथरफोर्ड ( २८) माघारी परतले होते. राहुल तेवातिया व गेराल्ड कोएत्झी मैदानावर होते. मध्यरात्री १२:३० वाजता १९ षटकांत १४७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले आणि गुजरातने मॅच जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली.
हेही वाचा :
घराबाहेर मुले खेळत होती, तेवढ्यात बिबट्या धावत आला अन्…Video Viral
महाराष्ट्रात आजही वादळी-वाऱ्यासह पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी दक्षतेचा इशारा