पत्नी जीवावर उठली, आमरसातून दिल्या झोपेच्या गोळ्या

आंबा किंवा आमरस हा बहुतांश लोकांचा वीक पॉईट. असह्य होणारा उन्हाळा, (sleeping)लोकांना आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे आंबे. पण हाच आमरस कोणाच्या जीवासाठी घातक ठरला तर ? एका महिलेने तिच्या पतीला आमरसामध्ये गुंगीच्या गोळ्या घालून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आंबा किंवा आमरस हा बहुतांश लोकांचा वीक पॉईट. असह्य होणारा उन्हाळा, लोकांना आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे आंबे. पण हाच आमरस कोणाच्या जीवासाठी घातक ठरला तर ? एका महिलेने तिच्या पतीला आमरसामध्ये गुंगीच्या गोळ्या घालून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुळजापूर तालुक्यातील नांदगावमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी त्या पत्नी, भाग्यवती चिनगुंडे हिच्याविरोधात नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(sleeping) पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

नेमकं काय झालं ?

फिर्यादी महेशकुमार चिनगुंडे हे तुळजापूर तालुक्यातील नांदगाव येथे राहतात. महेशकुमार यांना त्यांची पत्नी भाग्यवती यांनी 24 मे रोजी संध्याकाळच्या जेवणासाठी आमरस दिला. मात्र त्यांनी त्यामध्ये गुंगी येणाऱ्या, झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. या गोळ्यांचे सेवन केल्याने महेशकुमार यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो,(sleeping) हे माहीत असतानादेखील भाग्यवती यांनी कोणत्याही डॉक्टरचा सल्ला न घेता किंवा डॉक्टरच्या परवानगीशिवाय त्या रसात झोपेच्या गोळ्या टाकल्या. हा आमरस महेशकुमार चिनगुंडे आणि त्यांच्या घरातील इतर लोकांनीही खाल्ला आणि त्यामुळे त्यांनाही गुंगी चढली. परिणामी ते दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोप लागली. तसेच झोपेतून उठल्यानंतरही त्यांना शरीरात वेदना जाणवत होत्या.

त्यामागील कारण समोर आले आणि खरा प्रकार जाणून घेतल्यानंतर पती महेशकुमार चिनगुंडे यांनी त्यांची पत्नी भाग्यवतीविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यानुसार नळदुर्ग पोलीस ठाण्यात भाग्यवती चिनगुंडे यांच्याविरुद्ध कलम 328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यवती यांनी रसात गोळ्या का टाकल्या, पतीला आणि सासरच्या लोकांना तो रस का खायला दिला, त्यामागे त्यांचा नेमका हेतू काय होता, याचा पोलिस कसून तपास करत आहेत.लोकांना आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे आंबे

हेही वाचा :

सकाळी नाश्त्यात उरलेल्या चपातीपासून बनवा स्वादिष्ट समोसा

प्लीज हे थांबवा! रायुडूला ऑन-एअर जोकर म्हटल्याबद्दल केवीन पीटरसनने दिलं स्पष्टीकरण

जबरदस्त फीचर्स आणि 50MP कॅमेरासह Samsung Galaxy F55 5G लाँच

Viral Video : बापरे! लग्नात फायर गनची शायनींग पडली महागात