शेतकऱ्याकडून तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न

 राजगड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढावळे खुर्द येथे(farmer) जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याने एका २१ वर्षीय तरुणीला जेसीबीच्या सहाय्याने शेतात गाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रणाली बबन खोपडे (२१) असे त्या तरुणीचे नाव असून त्या तरुणीची आई कमल बबन खोपडे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात कोणाविरुद्ध देखील गुन्हा दाखल नसल्याचे वेल्हे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कमल बबन खोपडे आणि त्यांच्या दोन मुली या त्यांच्या शेतात असलेल्या गट नंबर ११४ मध्ये काम करत होत्या. यावेळी या ठिकाणी संभाजी खोपडे याने येऊन पंधरा ते सोळा गुंडांसहीत जेसीबी आणि ट्रॅक्टर आणून ही जमीन माझ्या नावावर झाली असून तुम्ही या जमिनीत(farmer) थांबू नका असे म्हणाला. त्यावेळी मुलगी प्रणाली ही विरोध करत असताना तिला जेसीबीने ढकलून देत तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य ओळखून कमल खोपडे यांनी वेळीच हस्तक्षेप करत दुसरी मुलगी प्राजक्ताच्या साह्याने तिच्या अंगावरील माती बाजूला काढून तिला वाचवले.

या प्रकरणी प्रणाली आणि तिची आई कमल यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तक्रारी अर्ज घेतला असून अद्यापही कुणावर गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली. याबाबत वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ म्हणाले, या प्रकरणी दोन्ही बाजू करून तक्रारी अर्ज दाखल झाले असून योग्य तो तपास करून चौकशी अंती गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेमध्ये मुंबई शिवडी येथील कुख्यात गुंड उमेश रमेश जयस्वाल उर्फ (farmer)राजू भैय्या घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. याने या ठिकाणी दहशत निर्माण करून ताबा घेण्याचा प्रयत्न केला. संबंधित मुलीला गाडण्याचा प्रयत्न करत दुसर्‍या महिलांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. राजगडच्या कोंढावळे खुर्दमध्ये वादातून तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर: इन्स्टाग्रामवरची ‘भाईगिरी’ पडली महागात

कोल्हापुरात छत्रपती विरुद्ध मंडलीक चुरशीची लढत

Viral Video : बापरे! लग्नात फायर गनची शायनींग पडली महागात

राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये 13 वर्षाच्या मुलीसह तिघांचा मृत्यू