धैर्यशील माने लोकसभेत दिसणार नाहीत ?
इचलकरंजी : ‘महाराष्ट्रात गद्दारी केलेल्या प्रत्येकाचा या निवडणुकीत सुफडासाफ होईल. यातील धैर्यशील(political strategist) माने हे उद्याच्या लोकसभेत दिसणार नाहीत. महाआघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या उमेदवारीला मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघात ते मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असून, शिवसेनेची मशाल धगधगणार आहे,’ असा दावा उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला.
सांगली दौऱ्यावर आलेले राऊत हे काल रात्री इचलकरंजीत दाखल झाले. त्यानंतर रोटरी मानव सेवा केंद्रात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर ठाकरे गटाचे प्राबल्य आहे. पण, शाहू छत्रपती महाराज यांनी काँग्रेसकडून लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे.
हातकणंगलेच्या जागेसाठी राजू शेट्टी यांच्याबरोबर (political strategist)चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा व मशाल चिन्हावर लढविण्याचा दोन्ही प्रस्ताव त्यांनी नाकारले. हातकणंगलेच्या जागेवर ठाम राहत सत्यजित पाटील यांच्यासारख्या निष्ठावंताला संधी देत तगडा उमेदवार दिला आहे. तिरंगी लढत असली तरी मतांची विभागणी न होता आमचा विजय सहजसोपा होणार आहे.’
पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, ‘इचलकरंजीच्या पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहतील, अशी भाषा त्यांनी केली होती, पण एक पाय तुरुंगात असताना ही भाषा त्यांना शोभत नाही. इचलकरंजीच्या पाण्याची जबाबदारी त्यांची आहे. वास्तविक पाण्याच्या प्रश्नावर निवडून आलेले खासदार माने यांनी हा प्रश्न सोडविला पाहिजे होता. सांगलीच्या जागेबाबत कोणताही तिढा नाही.’
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण पळविले, पण भाजपवाले(political strategist) धनुष्यबाण आता औषधालाही ठेवणार नाहीत. त्यानंतर शिंदे गटालाही ते ठेवणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी कोल्हापुरात आले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील. राज्यात महाविकास आघाडी ३५ पेक्षा जादा जागा जिंकेल, हे आता लोकांनी ठरविले आहे, तर मोदी देशात २०० जागा पार करणार नाहीत. यापूर्वीच्या दोन निवडणुकीत फसवणूक करणाऱ्या भाजपचे भाकीत त्यांच्यापेक्षा मला जास्त माहीत असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.’
हेही वाचा :
सुनेविरोधात प्रचाराला नकार देणारे मुलीच्या विरोधात प्रचार करतील का?
दोन महिला, 43 पुरुष आणि बंद खोली; रात्री घराबाहेर जमायची मोठी गर्दी
पतीने पत्नीच्या मृतदेहाचे केले 200 हून अधिक तुकडे गुगलवर शोधले पत्नीच्या हत्येचे फायदे