आंतरराष्ट्रीय(international) हेनली पासपोर्ट इंडेक्स नवीन जाहीर झाली असून, देशांच्या पासपोर्टच्या ताकदीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या देशांच्या पासपोर्टची ताकद जास्त असते, त्या देशांच्या नागरिकांना व्हिसा फ्री एन्ट्री मिळते. या यादीत आता अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.अमेरिकेचा पासपोर्ट आता 12 व्या क्रमांकावर घसरला आहे, आणि गेल्या 20 वर्षांत पहिल्यांदाच तो टॉप 10 मधून बाहेर पडला आहे. तटस्थ विश्लेषकांचे मत आहे की, अमेरिकेच्या धोरणांमुळे आणि विविध देशांमध्ये त्यावर कमी विश्वास असल्यामुळे हा घसरणीचा परिणाम झाला आहे.

याचबरोबर भारताचा पासपोर्ट देखील मागे सरकला आहे. गेल्या वर्षी भारत 80 व्या क्रमांकावर होता, तर आता 85 व्या क्रमांकावर आहे. भारताच्या नागरिकांना आतापर्यंत 57 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री मिळते. 2025 मध्ये भारताची क्रमवारी घसरणे ही नागरिकांसाठी थोडी चिंताजनक बाब आहे.दुसरीकडे, चीनने या यादीत सुधारणा केली असून, 2015 मध्ये 94 व्या स्थानावर असलेला चीन आता 64 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामुळे चीनच्या नागरिकांना परदेशात प्रवास करणे अधिक सोयीचे झाले आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेने टॅरिफ लादल्यानंतर ब्राझीलसह काही देशांनी (international)अमेरिकन नागरिकांसाठी व्हिसा नियम कडक केले, तर युरोपातील अनेक देशांनी चीनला व्हिसा फ्री प्रवेश दिला. यामुळे पासपोर्ट इंडेक्समध्ये अमेरिकेची घसरण दिसून आली आहे.
हेही वाचा :
विराट-रोहितला खेळताना पाहण्याची शेवटची संधी….
उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, म्हणाले….
आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, पालिकेकडून बोनस जाहीर….