महिलेने 4 मिनिटांत 4 बाळांना दिला जन्म
राजस्थानमधील जोधपूरमध्ये एक चमत्कार घडला आहे. येथे तुलचा कनवार नावाच्या महिलेने (birth)चार बाळांना एकाच वेळेस जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या चारही बाळांच्या जन्माच्या वेळेत प्रत्येकी एका मिनिटाचं अंतर आहे. म्हणजेच चार मिनिटांमध्ये या महिलेने चार गोंडस बाळांना जन्म दिला आहे. जन्माला आलेल्या बाळांपैकी 2 मुलं असून 2 मुली आहेत. या बाळांचा जन्म 10.55, 10.56, 10.57 आणि 10.59 ला झाला. जोधपूरमधील उमीद या सरकारी रुग्णालयामध्ये या महिलेची प्रसूती झाली.
आधी दोनवेळा तिची बाळं दगावली
जन्माला आलेली चारही बाळांची प्रकृती थोडी नाजूक असल्याने त्यांना (birth)विशेष देखभाली खाली ठेवण्यात आलं आहे. एकाच महिलेने चार मिनिटांमध्ये चार बाळांना जन्म दिल्याची बातमी काही वेळात संपूर्ण हॉस्पीटलमध्ये पसरली आणि जन्माला आल्या आल्या ही बाळं सेलिब्रिटी झाली आहेत. त्यामुळेच या बाळांकडे रुग्णालयातील कर्मचारीही विशेष लक्ष देताना दिसत आहेत. या महिलेची ही तिसरी प्रसूती होती. यापूर्वी दोन्ही वेळा तिच्या बाळांचा जन्माच्या पूर्वीच मृत्यू झाल होता. तुलचा ही मूळची राजस्थानमधील जैसलमेरची आहे, असं लोकल 18 ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. डॉक्टर फेब्रुवारीपासून तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होते. तुलचाने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिल्याचं समजल्यानंतर तिच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
फेब्रुवारीपासून रुग्णालयात दाखल
गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यामध्येच तुलचाला ती चार बाळांना जन्म (birth)देऊ शकते असं सांगण्यात आलं होतं. पूर्वीच्या दोन वेळी झाला तसा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून तिल्चाला कुटुंबियांनी वेळीच रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांचंही तिच्याकडे विशेष लक्ष होतं. सर्व धोका लक्षात घेता डॉक्टरांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तुलचाला रुग्णालयात दाखल करुन घेतलं. मागील महिन्याभरापासून डॉक्टर तिचे सर्व मेडिकल रिपोर्ट, औषधांची अगदी आपुलकीने काळजी घेत होते. सध्या या चारही बाळांना रुग्णालयातील दक्षाता विभागात देखरेखी खाली ठेवण्यात आलं आहे. उमीद रुग्णालयाचे निरिक्षक डॉक्टर अफजल हकीम यांनी, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिल्चाच्या सर्व गजरांची पुरेपूर काळजी घेतली. डॉक्टर इंद्रा भाटी यांच्या देखरेखीखाली तुलचाची प्रसूती झाली.
प्रकृती सुधारल्यानंतर डिस्चार्ज
तुलचा हिचे पती चंद्रा सिंहने, डॉक्टरांनी आम्हाला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिलेला. शरीरामधील वेगवेगळ्या गोष्टींची तपासणी करण्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग होतो. गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या हलचाली आणि वाढ यातून दिसून येते. यामध्येच चार बाळं होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. ही शक्यता खरी ठरली असून चारही बाळं जिवंत असून त्यांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये अपेक्षित सुधारणा झाल्यानंतर आई आणि बाळांना डिस्चार्ज दिला जाईल.
हेही वाचा :
महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून हायअलर्ट
चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; दिग्गज नेत्यांच्या सभांनी धुरळा उडणार
शेतकऱ्यांच लक्ष लागलेल्या भेंडवळच भाकीत आलं समोर