तरुणांना किडेबाजी भोवली; धावत्या बाईकवर उभे राहून स्टंट करायला गेले अन्…, Video Viral

सोशल मीडियावर रोज की ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे सोशल मीडियवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंटबाजीचे(stunts) प्रमाण वाढत चालेले आहे. यामध्ये विशेषत: तरुणाचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अनेकदा सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी ही तरुण मंडळी आपला जीव धोक्यात घालत आहे. एवढेच नव्हे तर आपल्यासोबत इतरांचाही जीव तरुण मंडळी धोक्यात घालत आहे.

अशा हिरोगिरीमुळे आतापर्यंत अनेकांचा गंभीर त्रास सहन करावा लागला आहे. परंतु स्टंटबाजी अजूनही सुरुच आहे. सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा(stunts) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुण सुसाट बाईक चालवत आहेत. तर एक तरुण धावत्या बाईकवर उभे राहण्याचा स्टंट करत आहे. परंतु तरुणाला दुचाकीवर उभे राहणे चांगलेच महागात पडले आहे. यामुळे त्याला आणि त्याच्यासोबतच्या मित्रांना गंभीर दुखापत झाली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही तरुण वाऱ्याच्या वेगाने बाईक बाईक चालवत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची रहदारी सुरु आहे. अशातच एक तरुण बाईकवर उभे राहण्याचा प्रयत्न करतो. काही वेळ तो बाईकवर उभाही राहतो. मात्र अचानक त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळतो.

सुदैवाने तो वेळेत बाईकचे हॅंडल पकडून पुन्हा बाईवर बसतो, परंतु त्याच्या मागे असलेल्या तरुणांची बाईकचा वेग जास्त असल्याने त्यांची धडक स्टंट करणाऱ्या तरुणाच्या बाईला होते. यामुळे मागील बाईकवरी दोन्ही तरुण बाईकवरुन खाली पडतात आमि फरपटत जातात. तसेच स्टंट करणाऱ्या तरुणाची बाईक देखील आजूबाजूला असलेल्या गवतांमध्ये घुसते.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहे. पण सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी असे धोकादायक स्टंट करणे आणि आपला आणि आपल्यासोबत इतरांचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे. अशा स्टंटबाजीमुळे आतापर्यंत अनेकांनी जीव देखील गमवला आहे.

हेही वाचा :

विराटच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी!

मोठी बातमी! 36 लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक

महत्त्वाची बातमी! Asia Cup 2025 न खेळण्याबाबत BCCI ने अखेरीस सोडले मौन