गॅस सिलिंडरचा पुरवठा होईल बंद 30 जूनपूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्त्वाचे काम

जर तुम्ही भारत गॅस चे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारत पेट्रोलियम ने गॅसधारकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

ई-केवायसी प्रक्रियेचा मुख्य उद्देश गॅसधारकांसाठी बायोमेट्रिक ई-केवायसी अनिवार्य केले आहे. येत्या ३० जून २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सिलिंडरचा पुरवठा आणि मिळणारी सबसिडी कायमची बंद होऊ शकते, (Gas cylinder) त्यामुळे तातडीने हे काम उरकून घ्या. सध्या शासन आणि तेल कंपन्यांकडून डिजिटल पडताळणीवर भर दिला जात आहे. बोगस आणि बेकायदेशीर गॅस जोडण्या शोधून काढण्यासाठी ही बायोमेट्रिक ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. या नव्या प्रणालीमुळे शासनाकडून दिली जाणारी एलपीजी सबसिडी योग्य आणि पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात कोणत्याही त्रुटीविना जमा होण्यास मदत होईल.

या पडताळणीसाठी कंपनीने ३० जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. जर या तारखेच्या आत ग्राहकांनी आपली माहिती अद्ययावत केली नाही, तर त्यांना मिळणारे अनुदान रोखले जाईल. इतकेच नव्हे तर, भविष्यात नवीन गॅस सिलिंडर बुक करतानाही मोठ्या अडचणी येऊ शकतात. (Gas cylinder) त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी त्वरित आपल्या कुटुंबातील गॅस जोडणीची स्थिती तपासून ती अद्ययावत करणे हिताचे ठरेल.

मोबाईल ॲप आणि गॅस एजन्सीद्वारे पडताळणी हे काम तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनवरून सहज करू शकता. यासाठी सर्वात आधी गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर वरून हॅलोबीपीसीएल नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. ॲपमध्ये तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ओटीपी टाकून लॉग इन करा. (Gas cylinder) त्यानंतर किंवा भारत गॅस या पर्यायावर जाऊन या बटणावर क्लिक करा. तिथे तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर आधारशी संलग्न असलेल्या मोबाईलवर दुसरा ओटीपी येईल, तो टाकून प्रक्रिया सबमिट करा. तुम्हाला लगेचच एसएमएस द्वारे पडताळणी पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.काही वेळेस केवळ ओटीपी द्वारे ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, त्यासाठी चेहऱ्याची ओळख किंवा बोटांचे ठसे आवश्यक असतात. जर मोबाईलवरून हे करणे शक्य होत नसेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या अधिकृत गॅस एजन्सी किंवा डीलरकडे जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. तिथे असलेल्या बायोमेट्रिक मशीनवर अंगठ्याचा ठसा देऊन अवघ्या काही सेकंदांत तुमची पडताळणी पूर्ण केली जाईल.

हेही वाचा

जत तालुक्यात पाणी टंचाईचे संकट

आनंदाची बातमी! म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार?

चालकाच्या चुकीने डंपर उड्डाणपुलाला लटकला