डिझेल टंचाईचे संकट गडद साठेबाज मात्र जोमात

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य शासन असा दावा करतय की पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेशा प्रमाणात आहे. आणि प्रत्यक्षात मात्र दिसतंय ते वास्तव वेगळेच आहे. त्यामुळे नेमकं सत्य काय हे समजण्यास मार्ग नाही. डिझेल टंचाईमुळे महागाईच्या झळा वाढल्या आहेत आणि त्याचप्रमाणे त्याचा प्रत्यक्ष फटका बळीराजालाही बसतो आहे. नेमकं डिझेल मुरतय कुठे असा प्रश्न जसा शेतकऱ्याला पडला आहे (petrol and diesel) तसाच तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पडला आहे. केवळ दोनच दिवस पुरेल इतका इंधन साठा भारताकडे आहे असा एक व्हिडिओ मंगळवारी दिवसभर व्हायरल होत होता. नंतर हा व्हिडिओ बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताकडे किमान 69 दिवस पुरेल इतका इंधन साठा आहे.त्यामुळे कोणीही चिंता करू नये असे आवाहन शासनाकडून केले जात आहेमात्र प्रत्यक्षात मात्र अनेक पेट्रोल आणि डिझेल पंपावर”साठा संपला आहे”असे फलक लागले आहेत. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात इंधन खरेदीसाठी पंपावर रांगा लागलेल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र असे सुस्पष्ट शब्दात सांगितले आहे की, इंधन साठा भरपूर आहे, काळजी करायचे कारण नाही. मग नेमके डिझेल मुरतय कुठे असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे.दरवर्षीच्या मे महिन्याच्या एकूण मागणीच्या तुलनेत या महिन्यात डिझेलची 52 टक्क्यांनी मागणी वाढली आहे आणि ती अवास्तव आहे. पुरेशा प्रमाणात दिसेल उपलब्ध करून दिले असताना ते ग्राहकांना का दिले जात नाही असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनीच विचारला आहे. (petrol and diesel) त्यांच्या मते मागणीपेक्षा 52 टक्के जास्त इंधनपुरवठा करण्यात आला आहे आणि त्याचा काही नफेखोरांनी साठा करून ठेवला आहे असा त्याचा अर्थ होतो असे फडणवीस यांनी म्हटले आहे. आणि म्हणूनच त्यांनी आता साठेबाज कोण आहेत त्यांचा शोध घ्या असे आदेश दिले आहेत. टँकरद्वारे येणारे डिझेल हे पंपावरील भूअंतर्गत असलेल्या टाकीमध्ये सोडले जाते. या टाक्या रिकाम्या असतील तर मग साठेबाजानी येणारे टँकर अज्ञात ठिकाणी उतरवून घेतले आहे का याचाही शोध स्थानिक पोलिसांनी घेतला पाहिजे. पण हे सहजासहजी शक्य नाही. पुरवठा साखळीत कुठेतरी गोंधळ आहे किंवा तो मुद्दाम घडवून आणलेला आहे असे म्हणता येईल. म्हणजे या पुरवठा साखळीत शासकीय यंत्रणा सुद्धा येते. या यंत्रणेतील अधिकाऱ्यांना साठेबाजांनी खरेदी केली आहे का याचाही शोध घेतला गेला पाहिजे.

शासनाने केलेल्या दावा आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यात तफावत आहे हे निश्चित. गेल्या काही दिवसात डिझेलच्या आणि पेट्रोलच्या दरात चौथ्यांदा वाढ झाली आहे. आणि त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो आहे. डिझेल दरवाढीमुळे आणि ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा अनेक गावांना केला जातो आहे त्यात डिझेल टंचाईमुळे अडथळे आले आहेत. शिक्षण संस्थांच्या खर्च वाढला आहे परिणामी त्याचा फटका पालकांना बसणार आहे किंवा बसतो आहे. सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसलेला आहे. रोजचा तोटा किमान पातळीवर भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून भाडे वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाजगी क्षेत्रातील वाहतूक महाग झाली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये समझोता होणार आहे. तो अंतिम टप्प्यात आला आहे. समझोता करार झाल्यानंतर पश्चिम आशियाई देशावरील ऊर्जा संकट दूर होण्याची शक्यता आहे. समझोता झाल्यानंतर लगेच ऊर्जा व्यवस्था ठीक होईल असे नाही. कारण तेल साठ्यांवर युद्धकाळात जोरदार हल्ले झाल्यामुळे तेथील इंधन निर्माण व्यवस्था मोडकळीस आलेली आहे.बिघडलेली व्यवस्था पुन्हा सुव्यवस्थेमध्ये आणण्यासाठी काही कालावधी जाणार आहे आणि म्हणूनच युद्ध कायमसाठी थांबले तरी ऊर्जा सुरक्षा पूर्ववत व्हायला काही कालावधी जाणार आहे.(petrol and diesel) म्हणजेच युद्ध संपले आणि ऊर्जा संकट टळलेअसे नाही. काही महिने त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा

मान्सूनसंदर्भात महत्वाची बातमी ‘या’ तारखेला होणार एन्ट्री

बनावट, निकृष्ट औषधांवर ‘सीडीएससीओ’चा बडगा

रंकाळा प्रदूषणाबाबत महापालिकेला नोटीस