अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये फर्निचर(furniture) गोडाऊनला लागलेल्या आगीमध्ये दोन लहान मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातून खळबळ व्यक्त केली जात आहे. रविवारी मध्यरात्री अंदाजे 1 ते 2 वाजेच्या दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे कॉलेज परिसरात असलेल्या कालिका फर्निचरच्या दुकानाला आग लागली. यामध्ये दुकानाच्या मागे राहणाऱ्या आणि झोपेमध्ये असलेल्या रासने कुंटुंबाला घेरले. ही आग इतकी भीषण होती की, त्यातून या कुटुंबाला बाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरातील 2 लहान मुलांसह 3 प्रौढांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

या मृतांमध्ये मयूर अरूण रासने , वय 36 वर्ष, पत्नी पायल मयूर रासने, वय 30 वर्ष, दोन मुलं अंश मयूर रासने, वय 11 वर्ष, चैतन्य मयूर रासने, वय 6 वर्ष आणि आजी सिंधूताई चंद्रकात रासने, वय 85 वर्ष यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर यामध्ये मयूर यांचे वडिल अरूण रासणे आणि मालेगाव येथे नातेवाईंकांकडे गेलेले असल्याने ते या दुर्घटनेतून वाचले आहेत.

दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक माहीतीतून समोर आले आहे(furniture). मात्र अद्याप या घटनेचे ठोस कारण सांगता येत नाही. या आगीने रौद्र रूप धारण कलेले असल्याने ही आग विझवण्यास बराच वेळ लागला. पोलिस आणि अग्नीशमन दलाकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातून खळबळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

Advance Rent चा नियम बदलणार; होणार मोठा आर्थिक फायदा

डोनाल्ड ट्रम्प घाबरले? एक पाऊल टाकले मागे, अगोदर थेट धमक्या आणि आता…

सोन्याचे दर किंचित घसरले, चांदीचे भावही नरमले! जाणून घ्य़ा सविस्तर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *