राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Sharad Pawar) ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या चाचण्या सुरु आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, (Sharad Pawar) यात काळजीचे कोणतेही कारण नसून, ते केवळ नियमित वैद्यकीय तपासणीसाठी (रुटीन चेकअप) रुग्णालयात गेले आहेत.वाढते वय आणि सततच्या राजकीय व सामाजिक व्यग्रतेमुळे शरद पवार यांच्या प्रकृतीची नियमित काळजी घेणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या काही आवश्यक वैद्यकीय तपासण्या ब्रीच कँडी रुग्णालयात केल्या जाणार आहेत.
राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला, मुंबईत असूनही पटेलांची दांडी, तटकरे आणि भुजबळांमध्ये बैठकीतच जुंपली, तर पार्थ पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब नाही. त्यांच्या नियमित चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. (Sharad Pawar) त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि राज्यभरातील त्यांच्या चाहत्यांनी प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करू नये, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा
मान्सूनसंदर्भात महत्वाची बातमी ‘या’ तारखेला होणार एन्ट्री