‘नीट’ वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग अधिकाऱ्यांनी मंगळवारी एका महत्त्वपूर्ण कारवाईत ‘गॉड’ या नावाने व्हॉट्सअॅप चालवणाऱ्या तेजस हर्षदकुमार शहा याला बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेमुळे तपासाला एक नवीन आणि अत्यंत धक्कादायक दिशा मिळाली आहे.

संशयित चॅटिंग आणि डिजिटल पुराव्यांचा उलगडा तपास यंत्रणेने राष्ट्रीय परीक्षा संस्था च्या विषयतज्ज्ञ असलेल्या मनीषा हवालदार यांच्या सदाशिव पेठ येथील निवासस्थानावर धाड टाकली होती. (‘NEET’ paper) यावेळी अधिकाऱ्यांनी या महिलेचा आणि तिच्या पतीचा मोबाईल फोन जप्त केला. या फोनच्या तांत्रिक विश्लेषणादरम्यान अधिकाऱ्यांना ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या एका संपर्कासोबत केलेले अत्यंत संशयास्पद संभाषण आढळून आले. याच चॅटिंगमध्ये भौतिकशास्त्र या विषयाचे हाताने लिहिलेले प्रश्न सापडल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली.
सखोल चौकशीत असे समोर आले की, हा ‘गॉड’ नावाने सेव्ह केलेला मोबाईल क्रमांक तेजस शहा याचा आहे. अधिक माहिती काढली असता, हवालदार हिनेच तेजसला भौतिकशास्त्राचे प्रश्न आपल्या नवऱ्याच्या मोबाईलवर पाठवण्याची सूचना केली होती.(‘NEET’ paper) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषाने आपली सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबतचे व्हॉट्सअॅपवरील सर्व संभाषण स्वतःहून नष्ट केल्याचे कबूल केले आहे. याशिवाय, तिने स्वतःकडील भौतिकशास्त्राच्या हस्तलिखित नोट्सही जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा अधिकाऱ्यांना दाट संशय आहे.
आरोपीची भूमिका आणि न्यायालयाची कारवाई या संपूर्ण कटातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, तेजसने हवालदारच्या पतीला पाठवलेल्या हस्तलिखित नोट्समधील बहुतांश प्रश्न या वर्षीच्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे विचारले गेले होते. प्रश्न पाठवल्यानंतर तेजसनेही त्याच्याकडील सर्व संबंधित कागदपत्रे तातडीने नष्ट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या महत्त्वपूर्ण खुलास्यानंतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री तेजस शहा याला ताब्यात घेऊन थेट न्यायालयासमोर हजर केले. केवळ प्रश्न लिहून देण्याव्यतिरिक्त या रॅकेटमध्ये त्याचे आणखी कोणाशी आर्थिक किंवा तांत्रिक संबंध आहेत का, याचा आता कसून तपास केला जात आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान तपास अधिकारी आणि सरकारी वकील अभयराज आरीकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आणि (‘NEET’ paper) पुढील तपासासाठी आरोपीला सोबत घेऊन जाणे आवश्यक असल्याने त्यांनी प्रवासी कोठडीची मागणी केली. या युक्तिवादाची दखल घेत पुणे येथील न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. आर. मेंढे यांनी आरोपी तेजसला दोन दिवसांची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मंजूर केली आहे.
हेही वाचा
मान्सूनसंदर्भात महत्वाची बातमी ‘या’ तारखेला होणार एन्ट्री