‘मुलींचे विवस्त्र फोटो पाठवा’ शाळेकडून पालकांना WhatsApp मेसेज

नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.(message)येथील एका शाळेने पालकांकडे चक्क विद्यार्थिनींचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो मागितले. सुरुवातीला आरोपीनं शैक्षणिक कामाची बतावणी करून मुलींच्या पालकांकडे पासपोर्ट साइज फोटोची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या पालकांनी कसलीही शाहनिशा न करता फोटो पाठवले.

पण त्यानंतर आरोपीने विद्यार्थ्यांच्या पालकाकडे थेट अल्पवयीन विद्यार्थिनींचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो मागितले. याबाबत जेव्हा पालकांनी शाळा प्रशासनाकडे चौकशी केली असता भलताच प्रकार समोर आला. संबंधित फोटोंची मागणी शाळा प्रशासनाने नव्हे तर एका सायबर चोरट्याने मागितल्याचं समोर आलं. (message)याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुराच्या महाल परिसरातील एका शाळेतील आठवी आणि नववीच्या मुलींच्या पालकांना व्हाट्सएपवर मॅसेज करून शाळेतील शिक्षण अधिकारी बोलत असल्याची बतावणी आरोपीने केली होती. सुरुवातीला आरोपीनं शैक्षणिक कामासाठी मुलींचे पासपोर्ट फोटो पाठण्याचा संदेश मुलींच्या पालकांना व्हाट्सएपवर केला. (message)पालकांनी देखील कुठलीही खातरजमा ना करता अनोळखी व्हाट्सएप क्रमांकावर मुलींचे पासपोर्ट फोटो पाठवले.
संबंधित बातम्या

यानंतर आरोपीनं शासकीय योजनांसाठी मुलींचे अर्धनग्न फोटो आवश्यक असल्याचं सांगत, त्या प्रकारचे फोटो पाठवण्याची मागणी पालकांकडे केली. यानंतर पालकांना शंका आली असता, त्यांनी शाळेतील शिक्षकांकडे संपर्क साधला. यानंतर हा सगळा गैरप्रकार असल्याचं समोर आलं. शाळेतील 15 ते 16 मुलींच्या पालकांसोबत हा गैरप्रकार घडला आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात सायबर कायद्यासह इतर कालामंतार्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका ही 4 कामे, आयुष्यावर होईल वाईट परिणाम

निक्की-अरबाज झाले इंटिमेट, फोटोशूटमध्ये ओलांडल्या रोमान्सच्या सगळ्या मर्यादा

‘मी तिच्यासमोर नग्न…’ वहिनी श्रीदेवीसोबत ते सीन करताना अनिल कपूर यांची झाली वाईट अवस्था