पक्ष तोडण्याची लायकी पाकिस्तान तोडण्याची नाही संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (broken)अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी, १२ मे रोजी, देशाला संबोधित केले. या भाषणात त्यांनी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना कठोर शब्दांत इशारा दिला होता. आता या भाषणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत बोचरी आणि परखड टीका केली आहे.संजय राऊत म्हणाले की, “पंतप्रधान मोदींचे भाषण हे एक नंबरचे बकवास भाषण होते. ते विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचे भाषण नव्हते. आमचे सैन्य, आमचे हवाई दल आणि आमचे नौदल हे संपूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीत असताना, तुम्ही अवसानघात केला आणि त्यांना थांबवले. नाहीतर, या कारवाईत पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले असते.”

“काल माझ्या लक्षात आले की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे केवळ ईडी आणि सीबीआयच्या मदतीने राजकीय पक्ष तोडू शकतात. पक्ष तोडणे, पक्ष विकत घेणे, इतकीच यांची लायकी आहे. (broken)पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही. जर हिंमत असती, तर पुढील दोन दिवसांत पाकिस्तान फुटला असता, कारण आमच्या सैनिकांची तशी पूर्ण तयारी होती,” असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.:संजय राऊत पुढे म्हणाले की, “आता मला कळून चुकले आहे की, हे लोक तिरंगा यात्रा काढत आहेत. परंतु, भारताच्या तिरंग्याला हात लावण्याचीही यांची लायकी नाही. वीर सावरकरांचे अखंड भारताचे स्वप्न साकार करण्याची एक सुवर्णसंधी त्यांना मिळाली होती. मात्र, या लोकांनी केवळ गौतम अदानी आणि अंबानी यांच्यासाठी व्यापार केला आहे. त्यांच्यासाठी व्यापार मोठा आहे, देश नाही.”

“भविष्यात या सर्व सौदेबाजीचे तपशील बाहेर येतील,” असा हल्लाबोलही त्यांनी यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये (broken)आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या फैरी झडण्याची शक्यता आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताने अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली होती आणि भारताच्या विरोधात होणारा कोणताही दहशतवादी हल्ला सहन केला जाणार नाही, असा इशाराही दिला होता.

हेही वाचा :

रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका ही 4 कामे, आयुष्यावर होईल वाईट परिणाम

निक्की-अरबाज झाले इंटिमेट, फोटोशूटमध्ये ओलांडल्या रोमान्सच्या सगळ्या मर्यादा

‘मी तिच्यासमोर नग्न…’ वहिनी श्रीदेवीसोबत ते सीन करताना अनिल कपूर यांची झाली वाईट अवस्था