वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीने आपल्या मूळ राशीतून म्हणजेच कुंभ राशीतून(zodiac signs) निघून मीन राशीत प्रवेश केला. त्यानंतर शनीने नक्षत्र परिवर्तन देखील केलं. न्यायदेवता शनी 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला होता. याच नक्षत्रात 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत असणार आहेत. या दरम्यान शनी पद परिवर्तन करणार आहेत.

शनी 7 जून रोजी उत्तरा भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत. याचा स्वामी शनी आहे. शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे अनेक राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास
वृषभ राशीच्या(zodiac signs) लोकांना शनीचं उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणं फार लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे फार पूर्ण होतील. तसेच, परदेशात काम करण्याची तुम्हाला चांगली संधी मिळेल. या राशीच्या एकादश भावात शनी विराजमान असणार आहे. तसेच तुमचा अनेक दिवासांपासून सुरु असलेला माणसिक ताण हळुहळू दूर होईल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल.
कन्या रास
या राशीच्या शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणं भाग्याचं ठरेल. या राशीच्या सप्तम भावात शनी असणार आहे. या राशीच्या लोकांची लव्ह लाईफ फार चांगली असणार आहे. तसेच, प्रेम विवाहाचे अनेक योग जुळून येणार आहेत. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. परदेशात व्यवसाय करण्याची संधी मिळेल.

तूळ रास
शनीचं उत्तरा भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करुन सहाव्या चरणात प्रवेश करणार आहे. या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. तसेच, शत्रूंवर तुम्हाला विजय मिळवता येईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदेल.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
पोलीस हेड कॉन्स्टेबलबाबत गृह विभागाचा सर्वात मोठा निर्णय!
विराट-अनुष्काच्या मुलांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पाकिस्ताने भारतासमोर गुडघे टेकले! PM शाहबाज शरीफ शांततेसाठी भारताशी चर्चा करणार