पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका सुरक्षारक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती उघड झाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख ज्ञानेश्वर शिवाजी गाडेकर (वय २९) अशी असून ते मूळचे किल्लारी येथील रहिवासी होते आणि सध्या फुरसुंगी परिसरात वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडेकर हे हडपसरमधील एका (shocking incident) खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे डबा घेऊन कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र ते त्या दिवशी कामाच्या ठिकाणी पोहोचलेच नाहीत आणि रात्रीपर्यंत घरीही परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना चिंता लागून राहिली होती.
दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सुमारास हडपसर ग्लायडिंग सेंटर परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला.
पोलिसांनी मृतदेहाची तपासणी करताना त्याच्या खिशात काही कागदपत्रे आणि वस्तू सापडल्या. त्यावरून त्याची ओळख पटवण्यात आली आणि नंतर कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, वैयक्तिक, आर्थिक किंवा अन्य कोणतेही कारण या घटनेमागे आहे का याचा शोध घेतला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुण्यातील नागरिकांमध्ये चिंता आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
SBI ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ वेळेत तात्पुरत्या सेवा बंद राहणार
सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत
GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?