सोलापूर: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून वैष्णवीने गेल्या महिन्यात १६ मे रोजी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेला महिना उलटत नाही तोच आणखी एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापुरातील आशाराणी भोसले नावाच्या २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या(Suicide) केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील विवाहिता आशाराणी भोसलेला तिच्या सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी सातत्याने मानसिक आणि शारिरीक त्रासा दिला जात होता. माहेरच्यांकडून चारचाकी आणि पैसे घेऊन येण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात होता. याच छळाला कंटाळून आशाराणीने गळफास घेत आयु्ष्याचा शेवट केला. या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी तिचा पती, सासू आणि सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर आशाराणीची हत्या झाल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा तिच्या माहेरच्यांकडून करण्यात आला आहे.
आशाराणी भोसलेच्या यांच्या माहेरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये आशाराणीची मोठी बहीण उशाराणी हिचा विवाह ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी झाला होता. त्यानंतर त्यांचा लहान भाऊ पवन भोसले याने आमची धाकटी मुलगी आशाराणी हिला पळवून नेऊन तिच्याशी विवाह केला. पण मुलगी झाल्यापासून आशाराणीला तिच्या सासरच्यांकडून मारहाण केली जात होती. पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर आम्ही मुलीला पुन्हा नांदायला पाठवले, पण मंगळवारी ( ३ जून) तिने आत्महत्या(Suicide) केली. आशाराणीला वैष्णवी नावाची तीन वर्षांची मुलगी आहे.
आशाराणीला तिच्या पवन भोसले याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले आणि दोघांनी लग्न केले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, पण मुलगी झाल्यानंतर तिच्यावर छळ सुरू झाला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आशाराणीला वारंवार मारहाण केली जात होती. इतकंच नव्हे, तर तिच्या माहेरच्यांना व्हिडिओ कॉल करून मारहाणीचे दृश्य दाखवले जात होते. त्यामुळे आशाराणीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आशाराणीची मोठी बहीण उशाराणी हिलाही सासरच्यांकडून छळ आणि मारहाण करण्यात आल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी ती तिच्या माहेरी रायचूरला निघून आली(Suicide). दरम्यान, आशाराणी भोसले हिची मोठी बहीण उशाराणी हिचा विवाह मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील ज्ञानेश्वर भोसले यांच्यासोबत 2019 साली झाला होता. त्या वेळी आशाराणी आणि ज्ञानेश्वर यांचा धाकटा भाऊ पवन यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पवन याने आशाराणी हिला पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला.
लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना कन्यारत्न झाले. वैष्णवी असे या मुलीचे नाव असून तिच्या जन्मानंतरच आशाराणीवर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. चारचाकी गाडी आणि खर्चासाठी पैसे आणावेत, यासाठी तिला सातत्याने त्रास दिला जात होता. दोन वेळा तर पवन याने व्हिडीओ कॉलवरूनच आशाराणीच्या आई-वडिलांसमोर तिला मारहाण केली.
2024 साली छळ सहन न झाल्यामुळे आशाराणी माहेरी रायचूरला निघून आली. त्यानंतर पती पवन याने ‘पत्नी नांदायला येत नाही’ अशी तक्रार पोलिसांत केली. महिला तक्रार निवारण केंद्राच्या समुपदेशनानंतर आशाराणीला पुन्हा सासरी पाठवण्यात आले. मात्र वर्षभराच्या आतच तिचा दुर्दैवी अंत झाला. आत्महत्येनंतर तिची तीन वर्षांची मुलगी वैष्णवी सासरच्या ताब्यात होती. मात्र आज काही वेळापूर्वी ती आशाराणीच्या माहेरच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा :