अभिनेत्री(actress ) अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन या दोघांनी बिग बॉस 17 मध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये दोघांमध्ये खूप भांडणे झाली. अनेक वेळा विकी जैन हा पत्नी अंकितावर चिडताना दिसला. तर कधी कधी विकी जैनला अंकिताचे वागणे पटले नाही. त्यावेळी त्याने चिडून डोक्याला देखील हात लावला. मात्र, दोघांमधील प्रेम कधीच कमी झालं नाही.
या शोमधून बाहेर पडल्यानंतर देखील दोघांनी एकमेकांना साथ दिली. या शोमधून दोघांना खूप प्रसिद्धी मिळाली. दोघांचे देखील सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. यामधील अंकिता लोखंडेची रिअॅक्शन बघण्यासारखी आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडेचा पती विकी जैन हा दुसऱ्याच अभिनेत्रीचा हात हातात धरून तिच्यासोबत बोलताना दिसत आहे. यावेळी तिथे गौहर खान, मीरा चोप्रा आणि मनोज वाजपेयी देखील उपस्थित होते. यामध्ये विकी हा मीराचा हात हातात पकडून तिच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहे.
तर अंकिता ही पती विकी जैनच्या पाठीमागे उभी आहे. काही वेळ गप्पा मारल्यानंतर विकी मीराचा हात सोडून अंकिताकडे(actress ) जातो. त्याच वेळी अंकिता ही विकीला काय? असा इशारा करते. त्यावर विकी जैन हा तिला काही तरी उत्तर देतो. मात्र, अंकिता ही विकीकडे रागानेच बघताना दिसते. सध्या याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
विकी जैनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये चाहत्यांनी दोघांचा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने विकी हा अंकिताला सोडून बाकी सर्व अभिनेत्रीसोबत फ्रेंडली होतो असं म्हटलं आहे. तर एकाने घरी चल मग दाखवते असं म्हटलं. तर दुसऱ्याने अंकिता असताना देखील विकीने तिचा हात का धरला असं प्रश्न विचारला आहे. मात्र, यावेळी अंकिता लोखंडेने दिलेली रिअॅक्शन सध्या खूपच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर अंकिता नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत.
हेही वाचा :