जेवणात टाकला जमिनीवरचा कचरा, हे काय चाललंय हॉटेलमध्ये? व्हिडीओ पाहून संताप होईल अनावर

आपल्यापैकी अनेकांना हॉटेलमध्ये जेवण करायला आवड असेल. अर्थात हॉटेलमधील पदार्थ हे चवीला फारच छान असतात.(hotel) ते पदार्थ खाऊन पोट तर भरतंच पण मन सुद्धा तृप्त होतं. पण हे चविष्ठ पदार्थ स्वच्छ आहेत का?याबाबत मात्र कायम शंका असते. कारण चकाचक दिसणाऱ्या अनेक हॉटेल्सचे किचन हे अत्यंत अस्वच्छ असतात. असे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.अन् या यादीत आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. एक सफाई कर्मचारी जमिनीवरचा कचरा उचलतो आणि थेट गॅसवर शिजत ठेवलेल्या अन्नपदार्थात टाकतो.

खरं सांगायचं झालं, तर हा व्हिडीओ कोणत्या हॉटेलमधला आहे, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण हा व्हिडीओ पाहून हॉटेलमधील स्वच्छतेबाबत मात्र शंका बळावते.कारण, या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की जमिनीवरचा कचरा उचलून थेट शिजत असलेल्या पदार्थात टाकण्यात आला.(hotel) हे दृश्य हॉटेलमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झालं, त्यामुळेच इंटरनेटवर त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

आता हे कृत्य त्या व्यक्तीनं का केलं? याबाबत सुद्धा कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण जर कोणी तो पदार्थ खाल्ला असेल, तर संबंधित व्यक्ती नक्कीच आजारी पडला असेल. आणि अर्थातच, यासाठी त्या हॉटेलची जबाबदारी ठरते.हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (hotel)कोणी म्हणतंय ‘अशा लोकांना थेट हाणायला हवं!’ तर काही जण म्हणतायेत, ‘शिक्षा म्हणून याच कर्मचाऱ्याला तोच पदार्थ खायला घालावा.’

दरम्यान, काहींच्या मते हा व्हिडीओ स्क्रिप्टेड म्हणजेच मुद्दाम बनवलेला आहे. असो, पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात काय विचार आले? तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर सांगा. आणि हो, तुम्हालाही हॉटेलमधले पदार्थ खायला खूप आवडतात का? याबाबतही खाली कमेंट करून नक्की कळवा.

हेही वाचा :