३० दिवसांसाठी साखर सोडणे आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरेल. साखर जास्त खाण्याने शरीर घातक होऊ शकते.(healthy)शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीराला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. अशामध्ये किमान ३० दिवसांसाठी साखर सोडा याने कोणते फायदे होऊ शकतात? चला तर मग जाणून घेऊयात.साखर सोडल्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा यकृताला होतो. यकृतावर जमणारी चरबी वितळू लागते. त्यामुळे फॅटी लिव्हरसारखा होणारा त्रास कमी होतो. साखर खाणे सोडल्याने किडनीवर होणार त्रास कमी करता येतो. साखरेत असणाऱ्या काही घटकांच्या सेवनामुळे किडनीवर प्रेशर येतो.
आपण हे सेवनच टाळले तर किडनीवरील प्रेशर नष्ट होईल आणि कार्यक्षमताही बऱ्यापैकी सुधारेल. (healthy)जास्त साखरेच्या सेवनाने धमन्यांमध्ये सूज येते. यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते. या गोष्टी टाळण्यासाठी साखर सोडणे कधीही महत्वाचे असते. साखर पूर्णपणे सोडल्यानंतर शरीरात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि झिंकसारख्या आवश्यक मिनरल्सचे शोषण अधिक प्रभावीपणे होऊ लागते. हे मिनरल्स हाडं, स्नायू आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.
हार्वर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या मते, एक महिना साखर सोडताना तुम्ही काही निवडक फळं खाणं पूर्णपणे सुरक्षित आहे. (healthy)सफरचंद आणि बेरीसारखी ताजी फळं यामध्ये नैसर्गिक साखर असते, पण त्यासोबत फायबर, अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्सही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ही फळं खाणं फायद्याचं ठरतं. मात्र, फार गोडसर फळं जसं की द्राक्षं, अतिपक्व केळी आणि आंबा यापासून साखर सोडण्याच्या काळात थोडं अंतर ठेवणं योग्य ठरतं.तसेच या काळात फ्रूट ज्यूस आणि ड्रायफ्रूट्सदेखील शक्यतो टाळावेत, कारण त्यात नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं.तुम्हाला आयुष्यभर साखर सोडणं आवश्यक नाही. मात्र केवळ ३० दिवस साखरेपासून ब्रेक घेतल्यास तुमचं शरीर खोल पातळीवरून डिटॉक्स होतं आणि तुम्हाला ताजंतवानं वाटू लागतं. त्यामुळे या प्रक्रियेकडे शिक्षा म्हणून न पाहता, एक आरोग्यदायी डिटॉक्स म्हणून पहावं.
हेही वाचा :