सातारा: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. सतरा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. उसळधार पाऊस सुरु असल्याने कोयना धरणाच्या(dam) शिवसागर जलाशयात मोठ्या प्रमाणत पाणीसाठा वाढत आहे. दरम्यान कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे. तसेच सांगली साताऱ्यात देखील अलर्ट जरी करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात असलेले कोयना धरण(dam) हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे धरण आहे. कोयना धरणातून नदीपात्रात ११,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कालपर्यंत कोयना धरणातून करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना धरणाच्या परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे आज धरणाचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसरच सुरु करण्यात आला आहे. कोयना धारण परिसरात जोरदार पाऊस कायम आहे. कृष्णाकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा जिल्हा आणि शिवसागर जलाशयात पाऊस सुरु असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विसर्ग सुरु केला गेला आहे. कोयनेतून(dam) सोडले जाणारे पाणी हे थेट कृष्णा नदीला जाऊन मिळते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ, तासगाव, पलूस आणि मिरजमधील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला गेला आहे. कोयन्तेउन विसर्ग वाढवला असल्याने सातारा, सांगलीतील स्थानिक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
हेही वाचा :