भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपारिक चप्पलांपैकी एक असलेले कोल्हापुरी चप्पल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.(identified)कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल ‘प्रादा’ नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने केल्यानंतर कोल्हापुरी चप्पल चर्चेत आली होता. आता परत क्युआर कोडमुळे ही चप्पल पुन्हा चर्चेचा विषय बनलीय. आता कोल्हापुरी चप्पल आता QR कोडसह बाजारात उपलब्ध होणार आहेत.कोल्हापुरी चप्पल सुंदर डिझाईन्स, हस्तकला आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखल्या जातात. या चप्पल प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तयार केल्या जातात. २०१९ मध्ये त्यांना जीआय टॅग देखील मिळाला आहे. यामुळे या चप्पल या प्रदेशाची ओळख आहे. त्यामुळे इतरत्र बनवलेल्या चप्पल खऱ्या मानल्या जाणार नाहीत.
आता प्रत्येक कोल्हापुरी चप्पल जोडीवर एक QR कोड असणार आहे. (identified)जे स्कॅन केल्यानंतर ग्राहकांना कोणत्या कारागिराने चप्पल बनवली आहे. ती कोणत्या जिल्ह्यात तयार केली गेली आहे, त्यात कोणते तंत्रज्ञान आणि कोणता कच्चा माल वापरला गेलाय याची सर्व माहिती यातून मिळणार आहे.नावट कोल्हापुरी चप्पलांची विक्री थांबवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारची संस्था असलेल्या लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रने क्युआर कोडचा निर्णय घेण्यात आलाय. खऱ्या कारागिरांना ओळख देणे, ग्राहकांचा विश्वास बळकट करणे. पारंपारिक कोल्हापुरी हस्तकलेची प्रतिष्ठा राखणे हा यामागील उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोल्हापुरी चप्पलचा इतिहास १२ व्या शतकापासूनचा आहे. (identified)स्थानिक कारागीर स्वावलंबी व्हावेत आणि स्वदेशी हस्तकलांना चालना मिळावी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी २० व्या शतकाच्या सुरुवातीला याचा प्रचार केला होता. ही नवीन QR कोड प्रणाली केवळ कोल्हापुरी चप्पलांना बनावट उत्पादनांपासून वाचवणार नाही तर कारागिरांना खरी ओळख देणार आहे.
हेही वाचा :