कोल्हापुरातल्या नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला अंबानी यांच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्यात आले आहे.(farewell) सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सोमवारी रात्री हत्तीणीला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर भावनिक झाला होता.या भावनिक प्रसंगी नांदणी मठाचे भट्टारक जिनसेन महास्वामीजी यांनी स्वतः हत्तीणीला हार अर्पण केला. हार घालतानाच त्यांना अश्रू रोखता आले नाहीत तर हे दृश्य पाहून महादेवी हत्तीणीच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान, नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देताना झालेल्या तोडफोड प्रकरणी 100 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तोडफोड करणाऱ्या 39 जणांची नावे निष्पन्न तर 100 ते 125 अज्ञातांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. नांदणीमध्ये झालेल्या तोडफोडीमध्ये 12 पोलीस आणि पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.(farewell)राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि सहकारी सागर शंभूशेटे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या सात गाड्यांची जमावाने तोडफोड केली. या घटनेत 1 लाख 50 हजारांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, महादेवी हत्तीण मागील ४० वर्षांपासून नांदणी मठाशी आणि गावाशी जोडलेली होती. (farewell)धार्मिक मिरवणूक, उत्सव आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये तिचा सहभाग होता. स्थानिक श्रावक, श्राविका, ग्रामस्थ आणि जैन बांधव हत्तीणीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते. अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. तर अनेकांनी तिच्या अंगावर हात फिरवून निरोप दिला.
हेही वाचा :