पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?

भारतातील इंधन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,(regarding)केंद्र सरकारने देशांतर्गत पातळीवर इथेनॉलमिश्रित पेट्रोलची निर्मिती वाढवण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सध्याच्या पेट्रोलच्या प्रकारांमध्ये बदल करून ई२२, ई२५, ई२७ आणि ई३० यांसारख्या उच्च क्षमतेच्या इंधनाची निर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे.सध्या देशभरातील पेट्रोल पंपांवर ई२० पेट्रोलची विक्री सुरू असली तरी, भारतीय मानक ब्युरोने आता ई२२ पासून ते ई३० पर्यंतच्या नव्या श्रेणीतील इथेनॉलमिश्रित इंधनासाठी अधिकृत मानके जाहीर केली आहेत. ई२० या इंधनात जसे २० टक्के इथेनॉल असते, तसेच ई२५ मध्ये २५ टक्के आणि ई३० मध्ये ७० टक्के गॅसोलीन किंवा पेट्रोलसोबत ३० टक्के इथेनॉलचे मिश्रण राहील.

महत्त्वाची बाब म्हणजे, बाजारात ई३० पेट्रोल थेट एकाच वेळी (regarding) उपलब्ध करून दिले जाणार नाही. शासनाने हे उद्दिष्ट टप्प्याटप्प्याने गाठण्याचे निश्चित केले आहे. नीती आयोगाच्या तज्ज्ञ समितीने तयार केलेल्या ‘भारतातील इथेनॉल ब्लेंडिंगसाठी रोडमॅप २०२०-२५’ या अहवालानुसार ई२० चे लक्ष्य २०३० पूर्वीच पूर्ण करण्याचा निर्णय झाला असून, २०२५-२६ नंतर इंधनाची टक्केवारी वाढवत ई२१ वरून ई२५ आणि ई३० कडे वाटचाल केली जाईल.

इंधनातील इथेनॉलचे प्रमाण वाढवण्यामागे देशाचा मोठा आर्थिक (regarding)आणि पर्यावरणीय फायदा दडलेला आहे. यामुळे परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावरील आपला भार लक्षणीयरीत्या कमी होईल आणि कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनाला आळा बसल्याने पर्यावरणाचेही रक्षण होईल. मात्र, यासाठी वाहन उत्पादक कंपन्यांनाही अधिक जबाबदारीने पुढाकार घ्यावा लागेल, कारण उच्च इथेनॉल मिश्रित इंधन वापरण्यासाठी बाजारात खास फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानावर आधारित वाहने आणावी लागतील.वाढत्या मागणीला पुरून उरण्यासाठी इथेनॉलच्या निर्मिती प्रक्रियेतही मोठे बदल केले जाणार आहेत. आतापर्यंत केवळ उसाची मळी अथवा सिरप वापरून बनवले जाणारे हे इंधन आता तांदूळ, मका आणि धान्याच्या तुकड्यांसारख्या कच्च्या मालापासूनही तयार केले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची पूर्तता करण्यासाठी देशभरातील विविध डिस्टिलरी प्रकल्पांची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे नियोजन सरकारने आखले आहे.

हेही वाचा

आता 100 रुपयांच्या मालावरही द्यावा लागणार टॅक्स

जास्त पगार असूनही बँक कर्ज देत नाहीये? तर ‘या’ ४ गोष्टींकडे लक्ष द्या

MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू