सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG ही महागला

सध्याची महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसलाय.(pocket) त्यात आता पेट्रोल डिझेलनंतर सीएनजीच्या दरातही बदल झालेले पाहायला मिळत आहेत. हा बदल नक्कीच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही. गेल्या १० दिवसांमध्ये सिएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ होताना दिसत आहे. कालपर्यंत ही किंमत ८०.०९ रुपये प्रतिकिलो सीएनजी होता. यात आता १ रुपयाने वाढ झालेली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, CNG ची ही वाढ जरी लहान वाटत असली तरी रोजच्या या वाढीमुळे एकूण रुपयात वाढ होत आहे. हा आकडा काहीच दिवसात १०० रुपयांपर्यंतही पोहोचेल अशी शक्यता आहे. याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितावर फटका बसेल. नुकतेच काही भागात रिक्षाचं भाडं वाढवण्यात आलं आहे. तसेच वाहन चालकांच्याही खिशाला कात्री लागलेली यामध्ये दिसत आहे. हे बदललेले दर दिल्लीतले आहेत.

सरकारने १५ मे रोजी CNGच्या दरात २ रुपयांनी वाढ केली.(pocket) पुढे ही वाढ १८ मे रोजी १ रुपयाने पुन्हा वाढवण्यात आली. याचा अर्थ १५ मे पासून सीएनजीच्या दरात ही तिसऱ्यांदा वाढ होत आहे. म्हणजेच सीएनजीहा एकूण ४ रुपयांनी महागला आहे.तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. यामध्ये पेट्रोल ८७ रुपयांनी तर डिझेल ९१ रुपयांनी महाग झालं आहे. १० दिवसांमध्ये ही तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. एकूण ५ रुपयांनी ही वाढ करण्यात आली आहे. तर ही महागाई आणखी किती रुपयांनी वाढेल याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष आहे. त्यातच सरकारने इंधन तुटवडा नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

मुंबईतील सीएनजीचे दर ८१.०० रुपये प्रति(pocket) किलो आहेत.
पुण्यातील सीएनजीचे दर ९२.५० रुपये प्रति किलो आहेत.
साताऱ्यातील सीएनजीचे दर ९५.५० रुपये प्रति किलो आहेत.
कोल्हापूरमधील सीएनजीचे दर ९६.९५ रुपये प्रति किलो आहेत.
ठाण्यातील सीएनजीचे दर ८१.०० रुपये प्रति किलो आहेत.

हेही वाचा

शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?

पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?

वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला