इचलकरंजी बनावट नोटाप्रकरणी पसार दोघांना अटक शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी 

शहापूरमधील एका हायस्कूल परिसरात असलेल्या पानपट्टीत (fake)दोनवेळा सिगारेट खरेदी करताना प्रमोद पोवार आणि अवधूत पोवार या दोघांनी २०० रुपयांच्या बनावट नोटा दिल्याचा प्रकार घडला. या प्रकरणातील पसार संशयित अर्जुन दळवी रा. विकली मार्केटजवळ आणि ओंकार साळुंखे रा. इचलकरंजी या दोघांना पोलिसांनी साळुंखे याच्या राहत्या घरातून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता , न्यायालयाने त्यांना ९ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

प्रमोद पोवार आणि अवधूत पोवार या दोघांनी एक मे व तीन मे रोजी शहापूरमधील एका पान शॉपमध्ये २०० रुपयांची नकली नोट देऊन खरेदी करीत असल्याचा प्रकार पानपट्टीचालकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला होता.(fake)याप्रकरणी पोलिसांनी प्रमोद पोवार, अवधूत पोवार दोघे रा. सुतार मळा या संशयितांना अटक केली होती, तर तपासादरम्यान प्रमोद व अवधूत यांनी अर्जुन दळवी व ओंकार साळुंखे यांच्याकडून नकली नोटा २० टक्के कमिशनवर घेतल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानुसार पोलिसांकडून अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंखे यांचा शोध सुरू होता. यादरम्यान अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंखे हे साळुंखेच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोघांना साळुंखेच्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, बनावट नोटा तयार करत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या गुन्ह्यातील चारही संशयितांकडून पोलिसांनी २०० रुपयांच्या एकूण १० नोटा जप्त केल्या आहेत. ज्या ठिकाणी या बनावट नोटा तयार करण्यात आल्या, (fake)त्या घराचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. मात्र, अजूनही नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य, प्रिंटर, कागद, इंक व इतर यंत्रणा जप्त केलेली नाही. त्याबाबत शोधकार्य सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का तसेच आणखी किती नोटा चलनात आणल्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा :

घराबाहेर मुले खेळत होती, तेवढ्यात बिबट्या धावत आला अन्…Video Viral

महाराष्ट्रात आजही वादळी-वाऱ्यासह पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी दक्षतेचा इशारा

त्यांनी कुंकू पुसण्याचा पाप केलं…; ऑपरेशन सिंदूरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

IPL 2025 दरम्यान विमानतळावर ९ किलो ड्रग्जची तस्करी, मुद्देमालासह ‘हा’ क्रिकेटपटू पोलिसांच्या ताब्यात..