सरकारी डॉक्टरला लागला भलताच नाद, बिकिनी घालून करायचा असं काही

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (created)या घटनेनं खळबळ उडाली आहे. इथे एका डॉक्टरवर स्वत: तृतीयपंथी असल्याचं दाखवून अश्लील व्हिडीओ तयार करून ते व्हिडीओ ऑनलाईन विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा आरोप दुसरा-तिसरा कोणी केला नसून त्याच्याच पत्नीनं केला आहे.घटनेबाबत अधिका माहिती अशी की हे प्रकरण उत्तर प्रदेशातल्या संत कबीर नगर येथील आहे. संत कबीर नगरमधल्या जिल्हा जेल परिसरात असलेल्या सरकारी निवासस्थानामध्ये हा डॉक्टर राहातो. वरुनेश दुबे असं या डॉक्टरचं नाव आहे. वरुनेश दुबे याची पत्नी सिंपी पांडे हिनेच आपल्या पतीविरोधात गंभीर आरोप केले आहेत.

माझा पती तृतीयपंथीयांचा पेहराव करून अश्लील व्हिडीओ बनवतो आणि नंतर तो ते व्हिडीओ पैशांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वर विकतो असा दावा त्याच्या पत्नीनं केला आहे. या डॉक्टरच्या पत्नीनं केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. सिंपी पांडेनं असा देखील दावा केला आहे की, मी माझ्या पतीला एका पुरुषासोबत नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं.घराची सजावट त्याच्या हातात असेली अंगठी आणि घटनास्थळी असलेलं बॅकग्राउंड पाहून मला खात्री पटली की हे आपलंच घर आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार सिंपीनं 18 मे रोजी याबाबत आपल्या पतीकडे विचारणा केली तर तिचा डॉक्टर पती तिच्यावर चांगलाच भडकला, तिला मारहाण करण्यापर्यंत प्रकरण पोहोचलं, त्यानंतर सिंपीनं घडलेली घटना आपला भाऊ आणि वडिलांना सांगितली. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं आहे.(created) सिंपीनं आपला पती वरुनेश दुबे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे प्रकरण अधिक गांभीर्य घेतलं आहे. पोलिसांनी डॉक्टर दुबेचं घर सील केलं आहे. तसेच या प्रकरणात एका उच्चस्थरीय समितीची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

या डॉक्टरच्या त्या व्हिडीओची आता फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या डॉक्टरविरोधात शारिरीक आणि मानसिक छळ, फसवणूक अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.तर दुसरीकडे डॉक्टर दुबे याने आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. हा व्हायरल झालेला व्हिडीओ फेक असल्याचा दावा त्याने केला आहे.

हा मला बदनाम करण्याचा डाव असल्याचं त्याने म्हटलं आहे.माझ्या पत्नीसोबतच माझे काही नातेवाईक देखील मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा मला संशय आहे. (created)एका प्रतिष्ठिती डॉक्टरचा असा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं तेथील स्थानिक नागरिकांना देखील प्रचंड धक्का बसला आहे. संबंधित घटनेचा तपास सुरू आहे, हा व्हिडीओ खरा आहे की खोटा आहे, हे लवकरच समोर येईल, त्यानंतर पुढील कारवाई करू असं या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं आहे.

हेही वाचा :

असं काय केलं महापाप की गर्लफ्रेंडने धावत्या बाईकवरच तरुणाला चप्पलीने दिला चोप ; Video Viral

रोहित शर्मानंतर कसोटीत भारताचं नेतृत्व कोणाकडे? ‘या’ दिवशी होणार घोषणा

सिंधू नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवल