प्रेमाला तुम्ही बांधू शकत नाही. ते कधीही, कुठेही, कोणावरही जडू शकतं. पण प्रेमाच्या बाबतीत भान बाळगणं आवश्यक असतं.(marry ) हे भान सुटलं, तर अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे प्रेम कधीही, कुठेही, कोणावरही होऊ शकतं, हे जरी खरं असलं, तरी त्यावर नियंत्रण ठेवणं सुद्धा तितकच आवश्यक आहे. प्रेमात चेहरा किंवा वय पाहिलं जात नाही. पण काही लोक प्रेमात इतके वेडे होऊन जातात की, समोरचा माणूस त्यांना कंटाळतो. असच एक प्रकरण मध्य प्रदेशच्या रतलाममधून समोर आलय. इथे दोन मुलांच्या घटस्फोटीत आईचा एका अल्पवयीन मुलावर जीव जडला. ती त्याच्यावर एकतर्फी प्रेम करु लागली. हा अल्पवयीन मुलगा त्या महिलेच्या नजरेत भरला. ती एक वर्ष त्या मुलाच्या मागे लागलेली. त्याला खूप सतवलं. अखेर या मुलाने कंटाळून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
हाटच्या चौकी ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. आरोपी महिला घटस्फोटीत आहे. तिला एक 14 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांचा मुलगा आहे. महिलेवर आरोप आहे की, तिने 17 वर्षाच्या मुलाला एक वर्ष टॉर्चर केलं. तिने फक्त या मुलाच लैंगिक शोषणच केलं नाही, तर लग्नासाठी अल्पवयीन मुलावर दबाव टाकत होती. (marry )लग्न केलं नाहीस, तर खोट्या प्रकरणात अडकवीन अशी धमकी ही महिला त्या मुलाला देत होती.
हाटचे चौकी प्रभारी मुकेश सस्तिया यांनी सांगितलं की, पीडित मुलगा आपल्या वडिलांसह पोलीस ठाण्यात आला होता. वडिलांनी सांगितलं की, “माझा मुलगा दहावीत आहे. एक घटस्फोटित महिला वर्षभरापासून माझ्या मुलाच शोषण करत आहे” “तक्रारीचा हवाला देऊन महिलेने याआधी दोनदा अशाच प्रकारे लग्न केलं आहे” (marry )असं मुलाच्या वडिलांनी सांगितलं. पीडित मुलाच्या वडिलांनुसार, “मागच्या वर्षभरापासून महिला त्यांच्या मुलाला वारंवार आपल्या घरी बोलवून धमकावयची. लग्नासाठी त्याच्यावर दबाव टाकत होती”पोलिसांनी सांगितलं की, प्राप्त तक्रारीच्या आधारावर FIR नोंदवण्यात आला आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला तुरुंगात पाठवलं. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :