यूपीमधील मैनपुरी येथील धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भाजपा महिला मोर्चाच्या माजी नगराध्यक्षा सीमा गुप्ता यांच्या मुलावर पत्नीने गंभीर आरोप केले आहेत.(serious )लग्नानंतर दुसऱ्या महिलेशी शारीरिक संबंध असून अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभमचे शीतलशी 20 नोव्हेंबर 2021 रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर काही काळातच पती-पत्नीच्या नात्यात कटुता निर्माण झाली. शुभम गुप्ताचे लग्नानंतरही एका महिलेशी संबंध असल्याचे शीतलने तक्रारीमध्ये म्हटले आहे. तसेच शीतलने दावा केला आहे की, तिच्या पतीने दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंधांचे अनेक व्हिडीओ बनवले आणि ते जाणीवपूर्वक तिला दाखवले. (serious )या व्हिडीओमुळे त्यांच्यातील वाद वाढले आणि अखेरीस हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकरणामुळे मैनपुरीत खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाने राजकीय वादळ निर्माण केले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या घटनेवरून भाजपावर टीका केली आहे. स्थानिक अहवालांनुसार, शुभम गुप्ता आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या कथित गैरवर्तनावरून वाद सुरू होते. शीतलने पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यामध्ये तिने शुभमवर सिगारेटने चटके देण्याचा आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. (serious )मात्र, कुटुंबाच्या राजकीय प्रभावामुळे ही बाब दडपण्यात आल्याचा दावा आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शुभम एका महिलेसोबत शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतलने थेट पोलिसांत धाव घेतली आणि शुभमविरुद्ध FIR दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी शुभम गुप्ता उर्फ रवी याला अटक केली आहे. या घडामोडींमुळे मैनपुरीत राजकीय चर्चा सुरू आहे आणि विरोधी पक्षांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा :