अभिनेत्री दीपिकाची तब्येत बिघडली, चाहते चिंतेत; पतीने दिली धक्कादायक माहिती!

लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड सध्या अत्यंत कठीण आरोग्य संकटाला सामोरी जात आहे. (fans)तिच्या यकृतामध्ये ट्यूमर आढळून आला असून, ती सध्या उपचार घेत आहे. पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने आपल्या यूट्यूब व्लॉगद्वारे दीपिकाच्या प्रकृतीबद्दलची ताजी माहिती दिली आहे. तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.दीपिकाला मागील काही दिवसांपासून पोटदुखी आणि तीव्र ताप जाणवत होता. वैद्यकीय तपासणीत तिच्या लिव्हरच्या डाव्या भागात ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले. ताप आणि वेदनांमुळे ती अतिशय अशक्त झाली असून, तिच्यावर सातत्याने उपचार सुरू आहेत.

शोएब इब्राहिमने सांगितले की, दीपिकाचा ताप 103 अंशांपेक्षा जास्त होता आणि वेदनाही खूप होत्या. त्यामुळे औषधांनीही फारसा फायदा झाला नाही. तिच्या तब्येतीमध्ये थोडी सुधार झाला असल्याने सोमवार, २६ मे रोजी शस्त्रक्रियेची शक्यता आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर अंतिम निर्णय घेतील.दीपिकाने आपल्या मुलाचे दूधही बंद केल्याचे शोएबने सांगितले. (fans)या संपूर्ण प्रक्रियेमुळे कुटुंब भावनिकदृष्ट्या खूप त्रस्त झाले आहे. शोएबने चाहत्यांना दीपिकासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले असून, “सर्व काही लवकर ठीक होईल” अशी आशाही व्यक्त केली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीपासून दीपिकाला पोटदुखी जाणवत होती. सुरुवातीला ही लक्षणे संसर्गामुळे असल्याचे समजून औषधोपचार सुरू करण्यात आले. मात्र, वेदना वाढल्यानंतर डॉक्टरांनी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. सीटी स्कॅनमध्ये तिच्या यकृतात ट्यूमर असल्याचे निदान झाले. (fans)हा ट्यूमर टेनिस बॉलच्या आकाराचा असून, त्याचा तातडीने शस्त्रक्रियेद्वारे उपचार करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.दीपिका कक्कडने टेलिव्हिजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिची अचानक प्रकृती खालावल्याची बातमी समजताच चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘गेट वेल सून’ मेसेजेसचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा :

असं काय केलं महापाप की गर्लफ्रेंडने धावत्या बाईकवरच तरुणाला चप्पलीने दिला चोप ; Video Viral

रोहित शर्मानंतर कसोटीत भारताचं नेतृत्व कोणाकडे? ‘या’ दिवशी होणार घोषणा

सिंधू नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवल