मे 2025 मध्ये देशभरात बँक(Banks) सुट्ट्यांचा मोठा प्रभाव जाणवणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये बँका 12 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बँकिंग कामांची योजना अगोदरच आखणे आवश्यक आहे.

मे महिन्यातील या सुट्ट्यांमध्ये दोन लाँग विकेंडचा समावेश आहे, ज्यामुळे सलग तीन दिवस बँका(Banks) बंद राहतील. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे बँकिंग काम असेल तर ते योग्यवेळी पूर्ण करणे गरजेचे आहे.
मे महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी :
1 मे 2025: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन
4 मे 2025: रविवार
9 मे 2025: रवींद्रनाथ टागोर जयंती
10 मे 2025: दुसरा शनिवार
11 मे 2025: रविवार
12 मे 2025: बुद्ध पौर्णिमा
16 मे 2025: राज्य दिन
18 मे 2025: रविवार
24 मे 2025: चौथा शनिवार
25 मे 2025: रविवार
26 मे 2025: काझी नजरुल इस्लाम जयंती
29 मे 2025: महाराणा प्रताप जयंती
या यादीवरून लक्षात येते की, मे महिन्यात सलग दोन लाँग विकेंड येणार आहेत, त्यामुळे आर्थिक व्यवहार नियोजनपूर्वक करणे आवश्यक आहे.
सर्व राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या सारख्या नसतात. वेगवेगळ्या सण आणि स्थानिक महत्त्वाच्या दिवसांनुसार प्रत्येक राज्यात सुट्ट्या वेगळ्या असू शकतात. याची अधिकृत माहिती RBI च्या वेबसाइटवर तपासता येऊ शकते. त्यामुळे, संबंधित राज्यातील सुट्ट्यांचा अंदाज घेऊनच आपली कामे नियोजित करावीत.

जरी बँका(Banks) बंद असल्या तरी बँकांच्या ऑनलाइन सेवा सुरू राहतील. इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय ट्रान्सफर, डेबिट-क्रेडिट कार्ड व्यवहार, आणि एटीएम सेवा या सुट्टीच्या दिवशीही सामान्यपणे चालू राहतील. त्यामुळे तातडीच्या गरजांसाठी ऑनलाईन बँकिंगचा वापर करणे सोयीस्कर ठरेल.
हेही वाचा :
२ गटातील तुंबळ हाणामारीत मुलाच्या डोक्यात दगड, दिवसाढवळ्या रस्त्यावर रक्तरंजित थरार
वय वर्ष 50 आजी पडली 30 वर्षीय नातवाच्या प्रेमात, पती आणि चार मुलांना दिला प्रेमाखातर डच्चू