धावत्या गाडीच्या छतावर बसून तरुणाचा धोकादायक स्टंट; अचानक तोल गेला अन्…, Video Viral

अलीकडे धोकादायक स्टंटबाजीचे प्रमाण वाढत चालले आहे. हिरोगिरी दाखवण्यासाठी, सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक जीव धोक्यात घालत आहे. यामध्ये विशेषत: तरुणांचे प्रमाण अधिक वाढले आहे. जीवाची कसलीही परवा न करता तरुण मंडळी प्राणघातक असे स्टंट(Stunt) करत आहेत. काही स्टंट इतके भयानक असतात की, पाहून अंगावर काटा येईल.

अलीकडे, बाईक स्टंट(Stunt), चारचाकी गाड्यांवर उभे राहून स्टंट करणारे असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणा चारचाकीच्या छतावर बसून धोकादाक स्टंट करत आहे. परंतु त्याचा स्टंट फसला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण गाडीच्या छतावर बसलेला आहे. तसेच तरुणाने गाडीचे दार उघडे ठेवून त्यावर पाय सोडनू बसला आहे. दरम्यान तरुण कारच्या दरवाज्याला धरुन आतामध्ये बसण्याचा प्रयत्न करत असतो. याच वेळी त्याचा तोल जातो. तोल गेल्याने तो कारसह घसरत पुढे जातो.

दरम्यान त्याचा पाय मागच्या कारच्या चाकात देखील अडकतो. हा व्हिडिओ इथेच संपलेला असून पुढे तरुणासोबत नेमकं काय घडले याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु व्हिडिओवरुन लक्षात येते की, तरुणाला नक्कीच गंभीर दुखापत झाली असणार आहे. व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अलीकडे असे धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरीही लोक स्टंट(Stunt) करण्यासापासून बाज येत नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @marathihasyaa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘हे असलं करण्यापूर्वी लक्षात ठेवा तुमची आई घरी वाट पाहत आहे!” असे लिहिले आहे.

एका युजरने म्हटले आहे की, आई बापांनी वेळेत लाथा घातल्या नाही म्हणून हे झालं तर दुसऱ्या एका युजरने मेला आहे का भाऊ असा प्रश्न केला आहे. कर अनेकांनी असे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

‘हे बेकायदेशीर आहे,’ क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच असं घडलं; फलंदाजाच्या खिशात चक्क…; VIDEO व्हायरल

अर्रर्र! हिल्सवर थिरकणं महिलेला पडलं महागात; पाय घसरला अन्…, Viral Video

पाकिस्तानला घाम फोडणारी बातमी: पुतिन यांच्या पाठिंब्यानं दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्या जाणार