BSNLचा ‘हा’ प्लॅन 150 रुपयांनी स्वस्त, Jio-Airtel ला देऊ शकतो टक्कर

आपल्याकडे चर्चेत असलेल्या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी(plan) नवनवीन प्लॅन ऑफर्स देत असतात. अशातच आता रिलायन्स जिओ आणि एअरटेलशी स्पर्धा करण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे एक उत्तम रिचार्ज प्लॅन आहे जो या दोन्ही कंपन्यांपेक्षा 150 रुपये स्वस्त आहे. बीएसएनएलचा 299 रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सारख्या सुविधा आहेत, या प्लॅनमध्ये किती जीबी डेटा उपलब्ध आहे आणि किती एसएमएस दिले जातात? ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

बीएसएनएल 299 प्लॅन
बीएसएनएलचा 299 रुपयांचा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर प्लॅन एक्सटेंशन कॅटेगरीत लिस्ट करण्यात आलेला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. डेटा मर्यादा संपल्यानंतर, (plan)वेग मर्यादा 40 केबीपीएस पर्यंत कमी केली जाईल. 299 रुपये खर्च केल्यावर, कंपनी तुम्हाला 30 दिवसांची वैधता देते.

जिओ 449 प्लॅन
रिलायन्स जिओच्या 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रीपेड युजर्सना दररोज 3 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळतो. बीएसएनएल प्लॅनप्रमाणे, हा प्लॅन देखील 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार सारख्या जिओ अनलिमिटेड ऑफर, 50 जीबी क्लाउड स्टोरेज आणि 50 दिवसांसाठी जिओ फायबर/एअरफायबर सेवा यांचाही फायदा मिळतो.

एअरटेल 449 प्लॅन
एअरटेल कंपनीच्या या 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा देखील मिळतो. या प्लॅनमध्ये स्पॅम अलर्ट, अमर्यादित 5G डेटा, 22 हून अधिक OTT अॅप्सचा मोफत अॅक्सेस, अपोलो 24/7 सर्कल (plan)मेंबरशिप आणि मोफत हॅलोट्यूनचा फायदा मिळतो.

फरक
बीएसएनएलच्या तुलनेत रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीचे हे प्लॅन 150 रुपये महाग आहेत. केवळ किंमतीतच नाही तर अतिरिक्त फायद्यांमध्येही फरक आहे, बीएसएनएल प्लॅन तुम्हाला कोणतेही अतिरिक्त फायदे देत नाही तर एअरटेल आणि जिओमध्ये तुम्हाला अतिरिक्त फायदे मिळत आहेत.

हेही वाचा :

जम्मू-काश्मीरमधून हादरवून टाकणारी बातमी समोर

लग्नासाठी तगादा लावल्याने प्रेयसीचा गळा दाबून खून; आरोपीला जन्मठेप

‘आगामी काळात शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादीत एकत्र असतील’; ‘या’ बड्या नेत्याचं विधान