आयपीएल 2025 चा यंदाचा सीजन शेवटाकडे वळत असतानाच आता त्याचा उत्साह काही काळासाठी थांबवण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या युद्धामुळे आयपीएल(Hardik Pandya) एका आठवड्यासाठी स्थगित केले आहे आणि ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आले आहे.

सर्व क्रिकेटपटू सोशल मीडियाद्वारे पोस्ट लिहत भारतीय सैन्याचे कौतुक करत आहे याशिवाय त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, हार्दिक पांड्याने(Hardik Pandya) मन जिंकले आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते हार्दिकचे कौतुक करताना दिसत आहेत.
भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा(Hardik Pandya) एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एअरपोर्टवर प्रवेशाच्या वेळी, हार्दिकला गेटवर भारतीय जवान दिसतो. त्यांना बघताच हार्दिक त्यांना सलाम ठोकतो आणि नंतर हात मिळवतो. त्यानंतर तो जवानाच्या पाठीवर थापही मारतो आणि निघून जातो. अशाप्रकारे हार्दिकने भारतीय सैन्याचे कौतुक केले. त्याने या आधीही पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता, त्यानंतर त्याने ऑपरेशन सिंदूर साठी भारतीय सैन्याचे खूप कौतुक केले होते.
8 मे पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरु झाला आहे. भारताने पाकिस्तानवर पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून हल्ला केला. नंतर पाकिस्तानने अचानक भारतावर ड्रोन हल्ला केला. त्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आयपीएल 2025 वरही दिसून आला. आयपीएल एका आठवड्यासाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलचे नवीन वेळापत्रक कसे असेल यावर आठवड्यानंतर चर्चा होईल.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघ गेल्या वर्षी संघर्ष करताना दिसला. हार्दिकला आयपीएल 2024 मध्येही बरीच टीकेचा सामना करावा लागला होता. पण या हंगामात मुंबई संघ ट्रॉफीच्या जवळ जाताना दिसत आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाने सलग 6 विजयांचा विक्रम केला. पण, शेवटच्या सामन्याच्या शेवटी संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा :
जम्मू-काश्मीरमधून हादरवून टाकणारी बातमी समोर
लग्नासाठी तगादा लावल्याने प्रेयसीचा गळा दाबून खून; आरोपीला जन्मठेप
‘आगामी काळात शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादीत एकत्र असतील’; ‘या’ बड्या नेत्याचं विधान