ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शाखेत आई आणि मुलाकडून चॉपर हल्ला करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाच्या शाखेत बसलेल्या लोकांवर आई आणि मुलाने चॉपरने हल्ला(attack) केला. सदर प्रकार सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाला आहे. तसेच हल्ल्याप्रकरणी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे दोन दिवसांत ठाण्यात हा दुसरा चॉपर हल्ल्याची(attack) घटना घडली आहे. त्यामुळे ठाण्यात नेमकं चाललंय तरी काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मागच्या काही काळापासून पुण्यात कोयता गँगने उच्छाद घातला आहे. पुणे शहरासह आसपासच्या परिसरात कोयता गँगच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पुण्यात कोयता गँग सक्रीय असताना ठाण्यात चॅापर गँग अॅक्टीव्ह झाल्याचं दिसून येत आहे.
ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयात काही लोक बसले होते. यावेळी महिलेसह एका मुलाने चॉपर हल्ला केला. यामध्ये काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. आफरीन या महिलेने भावावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हनिफ नावाच्या मुलाला घेवून केला चॅापर हल्ला केला. शनिवारी आफरीनचा भाऊ सोहेल खान याच्यावर हल्ला करण्यात आला होता.

नवपाडा पोलिस स्टेशन हद्दीत तीन पेट्रोल पंप येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सोहेल गंभीर जखमी झाला. त्याचा बदला घ्यायला आफरीन हातात चाकू घेवून चॅापरसह हनीफला घेऊन शिवसेना पक्षाच्या कार्यालयात पोहचली आणि चॉपरने हल्ला करण्यास सुरुवात केली. सदर प्रकरणातील सोहेल याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा :
पावसामुळे आज MI v DC मॅच रद्द झाली तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर?
वैभव सूर्यवंशीने मनं जिंकली! सामन्यानंतर धोनीच्या पाया पडला; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ
हटके एंट्री नवजोडप्याला पडली महागात; कमळात जाऊन बसताच लागली जोरदार आग; Video Viral