डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका; अॅपलच्या सीईओंना भरला दम

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर(terrorist) केलेल्या हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणात मध्यस्थी केल्याचा दावा केला होता. आता त्यांनी ऍपल कंपनीचे सीईओ टिम कुक यांना भारतात आयफोन उत्पादन न वाढवण्याचा सल्ला दिला आहे. कतारमधील उद्योजकांच्या भेटीत ट्रम्प यांनी हा सल्ला दिल्याचे सांगितले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळल्यानंतर, ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर भारतातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. भारताने स्पष्ट केले होते की, भारत-पाकिस्तान वादात तिसऱ्या कोणत्याही देशाने मध्यस्थी करण्याची गरज नाही. त्यानंतर, आता ट्रम्प यांनी ऍपल कंपनीचे सीईओ टिम कुक यांना भारतात कारखाने उभारण्याऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिला आहे. “माझं टिम कुकसोबत बोलणं झालं.(terrorist) तो भारतात सर्वत्र कारखाने उभारत आहे. मी त्याला स्पष्ट सांगितलं – मला भारतात काहीही नकोय,” असे ट्रम्प यांनी कतारमधील उद्योजकांच्या भेटीत सांगितले. या चर्चेनंतर ऍपल अमेरिकेत उत्पादन वाढवणार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे ऍपलच्या भारतातील उत्पादन योजनांना मोठा धक्का बसू शकतो. ऍपल कंपनी सध्या चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर आयफोनचे उत्पादन करत आहे. पुढील वर्षअखेरीस भारतातूनच अमेरिकेसाठी आयफोन आयात करण्याची ऍपलची योजना आहे. सध्या ऍपलचे एकही आयफोन उत्पादन युनिट अमेरिकेत नाही. ट्रम्प यांच्या सल्ल्यानंतर ऍपल अमेरिकेत उत्पादन सुरू करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर ९० दिवसांची शुल्क सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍपलचे सीईओ टिम कुक यांच्याशी चर्चा केली. भारतात आयफोन निर्मितीबाबत ऍपलच्या योजनांवर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले, “भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही, भारत स्वतःचं पाहू शकतो.” कुक अमेरिकेत आणखी प्लांट्स उभारण्याचा विचार करत आहेत. (terrorist)ऍपलने याआधीच अमेरिकेत ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्याच वेळी कंपनीने भारतातही आयफोन उत्पादन वाढवण्याची घोषणा केली होती.

ऍपलचे आयफोन मुख्यतः फॉक्सकॉनच्या दक्षिण भारतातील युनिटमध्ये तयार होतात. टाटा समूहाने विस्ट्रॉनचा भारतीय व्यवसाय खरेदी केला आहे आणि पेगाट्रॉनचे कामकाजही चालवत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टाटा आणि फॉक्सकॉन दोघेही भारतात नवीन कारखाने उभारत आहेत. मार्च २०२४ पर्यंतच्या १२ महिन्यांत ऍपलने भारतात सुमारे २२ अब्ज डॉलर्स सुमारे १.८३ लाख कोटी रुपये किमतीचे आयफोन तयार केले आहेत, ज्यात ६०% वाढ नोंदवली गेली आहे. ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामुळे ऍपलच्या भविष्यातील भारतीय उत्पादन धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

हेही वाचा :

कामाच्या वेळेत गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू; न्यायालयाने दिला मोठा निर्णय

‘त्या’ प्रकरणात कुख्यात गुंड अरुण गवळी निर्दोष, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

रॉटविलर कुत्रा कोणाचाच नसतो, चार महिन्याच्या मुलीसोबत जे केलं, ते ऐकून थरकाप उडेल